बाभळीच्या लाकडाची पांच हात लांब व पांच हात रुंद अशी एक वेदी बनीव; ती चौरस असून तिची उंची तीन हात असावी;
तिच्या चाऱ्ही कोपऱ्यास चार शिंगे बनवावी; ही शिंगे अंगचीच असावी; ही वेदी पितळेने मढवावी. तिच्यातील राख उचलून नेण्यासाठी हंडया, त्याप्रमाणेच तिच्यासाठी फावडी, कटोरे, कांटे आणि अग्निपात्रे बनवावी, तिची सर्व उपकरणे पितळेची असावी. तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी;
चाळणीच्या चाऱ्ही कोपऱ्यासाठी पितळेच्या चार कडया बनवाव्या. ही चाळण वेदीच्या सभोवती कंगोऱ्याच्या खाली अशी लावावी की ती वेदीच्या अर्ध्या उंची इतकी यावी.
वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे कर व ते पितळेने मढीव.
ते दांडे कडयात घालावे म्हणजे वेदी उचलली जाईल तेव्हा तिच्या दोन्ही बाजूस ते असतील. वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूस फळ्या बसवून बनवावी; पर्वतावर तुला दाखविल्याप्रमाणे ती करावी. (निर्गम २७: १-८)
पितळेनेमढवलेली वेदी, पितळेची वेदी किंवा अर्पण करण्याची वेदी जी बाहेरील अंगणाच्या अगदी आतमध्ये होती जेव्हा निवासमंडपात प्रवेश केला जात होता. वेदी साठी इब्री मूळ शब्द याचा अर्थ, 'मारणे' किंवा"कापणे" आहे. लैटीन शब्द अल्टा म्हणजे"उंच". वेदी ही उंच जागा आहे की"अर्पण/कापावे" करावे. वेदी ही पृथ्वीवरीलउंच ठिकाणी स्थित आहे,त्याच्या सभोवतालच्या वस्तूंपेक्षा उंच. हे ख्रिस्ता बद्दल निर्देश आहे, आपले अर्पण, ज्यास वधस्तंभावर उंच केले गेले, त्याची वेदी, जी एक टेकडी ज्यास गुलगुथा म्हणतात त्यावर होती.
वेदी ही बाभळाच्या झाडापासून घेतलेल्या लाकडापासून बनविली होती आणि तिला पितळेने मढवलेले होते (सामान्यतः बायबल मध्ये पापाचा न्याय हे चिन्हित करते), जी सर्व बाजूने ७.५ फुट आणि ४.५ फुट खोल होती. चार शिंगे चार कोपऱ्याच्या वरील टोकाकडून आणिआतून पितळेचा रखरखीत पृष्ठभाग कीप्राण्यास पकडता यावे.
वेदी हे प्राण्यांचे होमार्पण करण्याचे ठिकाण होते. याने इस्राएली लोकांना दाखविले की पापी मनुष्यानेपवित्र परमेश्वराकडे जाण्याअगोदर निष्पाप प्राण्याच्या रक्ता द्वारे स्वतःला प्रथम धुतले पाहिजे.
कोणतेही सामान्य इस्राएली बाहेरील अंगणात प्रवेश करू शकत होते परंतु केवळ याजकीय वंशज हे त्यापुढे आणि निवासमंडपात जाऊ शकत होते आणि केवळ मुख्य याजक प्रायश्चित्त दिवस, यॉम किप्पर च्या दिवशी वर्षातून एकदा परमपवित्र स्थानात प्रवेश करू शकत होता.
निर्गम २७: १६, "अंगणाच्या फाटकासाठी एक पडदा बनवावा; तो निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा असून बेलबुट्टीदार असावा. तो वीस हात असून त्याला चार खांब व चार उथळ्या असाव्या."
३० फुट दरवाजा हे प्रवेशद्वार होते. एकदाकी इस्राएली लोकांनी त्यांच्या अर्पणासह बाहेरील दरवाजाद्वारे अंगणात प्रवेश केला तेव्हा तो व्यक्ति"पवित्र भूमीवर" उभा आहे. जेव्हा आपण दरवाजाची पडताळणी करतो हे महत्वाचे आहे लक्षात घेणे की आपण नंतर दोन आणखी दरवाजे आणि पडदे यांविषयी चर्चा करणार आहोत. प्रवेशद्वार हे २०क्युबीट्स (३० फुट) होते. तो एक पडदा किंवा अंतरपट होता जो शिवलेल्या महाग वस्त्राने बनविलेला होता:
येथे बाहेरील अंतरपटावर करुबीम नव्हते. करुबीम हे केवळ परमपवित्र स्थानातच होते.
हा अंतरपटनिळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता जो निवासमंडपाच्या प्रवेशद्वारावर लटकणाऱ्या पडद्यासमान होता. परंतु तो पांढऱ्याकातलेल्या तलम सणाच्या कापडापेक्षा वेगळा होता, जो संपूर्ण अंगणाच्या चहुबाजूने होता. फक्त विचार करा इस्राएली लोकांना किती सुंदर दिसत असेन जेव्हा ते निवासमंडपाच्या दरवाजा जवळ येत असतील. सूर्याची तेज किरणे ही दरवाजावरील चार रंगावर चमकत असतील.
हाच केवळ आणि एकमेव मार्ग होता ज्याद्वारे पुरुष आणि स्त्रिया परमेश्वराजवळ येऊ शकत होते. हे संपूर्ण निवासमंडपासाठी एकच प्रवेशद्वार होते. तेथे आणखी दुसरा दरवाजा नव्हता. मग तो याजक असो जो त्याचे कर्तव्य करण्यासाठी तेथून जात आहे किंवा पश्चातापी पापी तेथे क्षमा मागत आहे, मनुष्यास ह्या मार्गा द्वारे प्रवेश करावयाचा आहे.
केवळ ह्या दरवाजा शिवाय कोणीही इतर कोणत्याही दरवाजा द्वारे तेथेप्रवेश करू शकत नव्हता. कोणताही इस्राएली जेव्हा ह्या निवासमंडपाजवळअर्पण घेऊन किंवा प्रायश्चित्त करण्यासाठी जात असे त्यास हे ठाऊक होते की पितळेच्या वेदीकडे जाण्याचा इतर कोणताही मार्ग नाही पण केवळ त्या दरवाजा द्वारे जो पूर्वेला आहे.
गणना २: ३, "पूर्वेस उगवतीकडे ज्यांनी आपआपल्या दलाप्रमाणे डेरे ठोकावयाचे ते यहूदाच्या छावणीतील निशाणाचे लोक असावे."
दरवाजा हा नेहमीच उघडा असे, कधीहीबंद नसे, कोणत्याची व्यक्तीला जेव्हा उपासना करावयाची आहे तेव्हा तेथे कोणी प्रतिबंध करणारा नसे. परंतु व्यक्तीने वैयक्तिक निर्णय घ्यायचा आहे की प्रवेश करावा जर त्यास प्राप्त करावयाचे आहे.
ख्रिस्ताचा प्रकार
येशूने स्वतःला प्रकट केले की परमेश्वराकडे जाण्याचा केवळ एकच मार्ग आहे. पूर्वेचा दरवाजा त्याकडे बोट दाखवितो.
परमेश्वराच्याधार्मिकतेद्वारे प्रत्येक इतर कोणतेही मार्ग हे प्रतिबंधित केले गेले आहेत परंतु येशू ख्रिस्ताच्या रक्ता मुळे आपल्याला प्रवेश करण्याचा मार्ग आहे. यहूदा वंश हा पूर्वेच्या दरवाजाबाहेर डेरे देऊन होता, राजाचा वंश, आणिवंश ज्याचा अर्थ स्तुती. येशू राजा असा आहे आणि सर्वकाही त्याच्या अधीन आहे. तो मलाख याहवे आहे, (परमेश्वर आमचा राजा).
स्वर्गातीलअगणित सेनेची उपासना ही त्याच्यासाठी सार्वकालिक अशी आहे. सुंदर दरवाजा प्रकट करतो की येशू कडे पाहणे किती सुंदर असे आहे. तो सर्वांगीणदृष्टया सुंदर आहे. त्यामध्ये काहीही त्रुटी नाहीत. तो चारित्र्यामध्ये सिद्ध असा आहे. जर आपण त्याचे मुख पाहू शकलो तर आपण प्रीतीचे पाहणे पाहू जे आपणांस कायमचे सामर्थ्य देईल.
"तूं इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की दीपनित्यजळत राहावा म्हणून त्यांनी दीपवृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे."
जोपर्यंत जैतून हे दाबले चेचले जात नव्हते, तेल हे त्यातून निघत नसे- तेल निघण्यासाठी येथे दुसरा कोणताही मार्ग नाही.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०