मग इस्राएल लोक प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाले व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीनायच्या रानात आले.(निर्गम १६:१)
दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी:
मागील महिन्याच्या पंधराव्या दिवशी ते मिसर देशातून निघाले होते या वास्तविकतेमुळे (निर्गम १२-१८), ते तेथून निघाल्यापासून पहिला महिना संपला आहे हे यास चिन्हित करते.
सीन रान, हे एलीम आणि सीनायच्या मध्ये आहे:
“सीन रान” या नावाचे मूळ वचनात पापाच्या कल्पनेशी काहीही संबंध नाही; ते कदाचित केवळ “झीन रान” असे अनुवादित केलेले असू शकते. या उलट, जसे कथा पुढे वाढत जाते, या रानाचा पापाशी बराच काही संबंध दिसतो.
२ लोक पुन्हा, रानात मोशे व अहरोन यांच्याकडे कुरकुर करु लागले; ३ ते म्हणाले, “परमेश्वराने आम्हाला मिसरमध्येच मारून टाकले असते तर बरे झाले असते कारण तेथे आम्हास खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूरहोते; परंतु तुम्ही आम्हांस येथे रानात आणले आहे; येथे आम्ही सर्वजण भुकेने तडफडून मरून जाऊ.” (निर्गम १६:२-३)
जेव्हा आम्ही मांसाच्या भांडयांभोवती बसून भरपूर जेवत होतो:
भूतकाळ आठवण्यासाठी इस्राएली लोकांचा निवडक दृष्टीकोन दिसतो आणि मिसर देशात व्यतीत केलेला त्यांचा वेळ सकारात्मक म्हणून विचार करताना दिसतो ते खोटे होते. देवाने भविष्यात त्यांच्यासाठी ठेवलेल्या आशीर्वादाला पाहण्यास ते असमर्थ होते, आणि त्याचबरोबर, त्यांनी त्यांच्या तक्रारीला योग्य ठरवण्यासाठी त्यांच्या भूतकाळाला विकृत केले होते. अशा प्रकारचा विचार करणे हे त्यांच्यामध्ये सामान्य आहे जे ओरड करतात आणि तक्रार करतात.
तुम्ही ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून आम्हांला ह्या रानात आणले आहे:
अशा व्यक्तींमधील आणखी एक प्रचलित आचरण जे तक्रार करतात ते अशी वागणूक दाखवणे आहे. मोशे आणि अहरोनाची वाईट इच्छा होती किंवा त्यांच्या मनात द्वेषपूर्ण हेतू होता याविषयी ते ठाम होते. यात शंका नाही, की मोशे आणि अहरोनाच्या मनात इस्राएली लोकांना मारण्याची इच्छा नव्हती आणि त्यांच्या विरोधात हा भयानक आरोप लावणे होता. या उलट, एक हृदय जे पूर्णपणे तक्रारीने भरलेले असते, त्या हृदयाला वारंवार त्या व्यक्तीवर आरोप करण्यास सोपे वाटते ज्यांच्या विरोधात ते वाईट हेतू असल्याची तक्रार करत असतात.
तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पाहा, मी आकाशातून तुम्हांसाठीअन्नवृष्टि करीन आणि लोकांनी बाहेर जाऊन एकएका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. (निर्गम १६: ४)
परमेश्वराकडून पुरवठा सुद्धा एक परीक्षा होती की ते परमेश्वराच्या आज्ञेनुसार चालतात किंवा नाही.
सहाव्या दिवशी जे काही ते जमा करून शिजवितील ते ते इतर दिवशी जमा करतील त्याच्या दुप्पट असावे. (निर्गम १६: ५)
जे तुम्ही सहाव्या दिवशी गोळा कराल, ते जितके तुम्ही गोळा करतात त्याच्या दुप्पट असावे.
म्हणून स्पर्धे विषयी विचार करू नका आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल (निर्गम १६: ७)
'सकाळच्या प्रार्थने साठी' एक चांगला पवित्र शास्त्र संदर्भ.
आणि मोशे म्हणाला, “तुम्ही एक सारखी तक्रार करीत आहात; परमेश्वराने तर तुमची तक्रार ऐकली आहे; तेव्हा आज रात्री परमेश्वर तुम्हाला मांस देणार आहे; आणि दर दिवशी सकाळी तुम्हाला पाहिजे तेवढ्या भाकरी मिळतील; तुम्ही अहरोनाकडे व मजकडे तक्रार करीत आहात तुम्ही माझ्या किंवा अहरोनाच्याविरुद्ध कुरकुर करीत नाही तर परमेश्वराविरुद्ध तक्रार करीत आहात हे लक्षात घ्या.”(निर्गम १६:८)
निर्गम १६:४, देवाने सकाळी स्वर्गातून भाकर देण्याचे आश्वासन दिले. येथे त्याने संध्याकाळी मांस देखील खायला देण्याचे आश्वासन दिले.
त्यासोबत, लोकांनी विश्वास ठेवला की ते मोशे आणि अहरोन यांच्याविषयी तक्रार करत आहेत (निर्गम १६:२). तुम्हांला सत्य सांगू दया, त्यांनी देवाविरुद्ध कुरकुर केली होती.
तरी सातव्या दिवशी ते गोळा करण्यासाठी काही लोक बाहेर गेले, पण त्यांना काही मिळाले नाही. (निर्गम १६: २७)
जेव्हा तुम्ही एक दिवस परमेश्वराला सन्मान देता, तेव्हा तुम्ही म्हणत आहात परमेश्वरा मी माझ्या सामर्थ्यावर अवलंबून राहत नाही, परंतु तुझ्या सामर्थ्यावर. एक दिवस उपासने साठी निश्चित केलेला आहे.
तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, एक पात्र घेऊन त्यात एक ओमरभर मान्ना घाल; ते तुमच्या पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर ठेवावयाचे आहे. (निर्गम १६: ३३)
मान्ना जो परमेश्वरासमोर ठेवला होता तो वितळला किंवा कमी झाला नाही. तो परमेश्वराच्या उपस्थितीत होता. गुपित मान्ना.
मोशे म्हणाला, परमेश्वराने अशी आज्ञा दिली आहे की, ह्यातले एक ओमरभर पुढल्या पिढ्यांच्या लोकांसाठी ठेवा; मी तुम्हांला मिसर देशांतून काढून आणून रानांत कोणत्या प्रकारचे अन्न दिले हे त्यांना ह्यावरून दिसेल.तेव्हा मोशे अहरोनाला म्हणाला, एक पात्र घेऊन त्यात एक ओमरभर मान्ना घाल; ते तुमच्या पुढील पिढ्यांसाठी परमेश्वरासमोर ठेवावयाचे आहे. (निर्गम १६: ३२-३३)
दशांश हा परमेश्वराच्या उपस्थितीत ठेवला गेला.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०