मग तो मोशेला म्हणाला, तूं अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलांपैकी सत्तर जण असे मिळून परमेश्वराकडे वर चढून येऊन त्याला दुरून नमन करा. (निर्गम २४:१)
आज तुम्हांला आणि मला दुरून उपासना करण्याची गरज नाही.
आपण परमेश्वराजवळ जाऊ शकतो कारण प्रभु येशूनेकालवरीच्या वधस्तंभावर आपल्यासाठी जे काय केले आहे.
एकटया मोशेने मात्र परमेश्वरासमीप यावे; बाकीच्यांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर त्याच्याबरोबर चढून वर येऊही नये.(निर्गम २४:२)
परमेश्वराजवळ जाणे हे कोणा थोडया विशेष लोकांसाठीच मर्यादित असे केलेले नाही. प्रवेश हा प्रत्येकाला दिला गेला आहे. पडदा हा फाडला गेला आहे आणि प्रवेश हा सर्वांसाठी मोकळा केला गेलेला आहे.
परमेश्वराजवळ येणे हे केवळ एक धार्मिक कार्य किंवा एक कर्तव्य नाही- महान पुरस्कार साठी तो एक मार्ग आहे.
"परमेश्वराजवळ या, म्हणजे तो तुम्हांजवळ येईल." (याकोब ४:८)
येथे तुम्ही आणि परमेश्वरासोबत एक घनिष्ठ संबंध असेल-एक संगती-एक मित्रता. सर्वसामर्थी परमेश्वरासोबत मित्रते पेक्षा काहीही मौल्यवान नाही. अब्राहामाला देवाचा मित्र असे म्हटले गेले आहे. जेव्हा तो तुमच्याजवळ येतो, तुम्ही त्याची वाणी इतक्या स्पष्ट ऐकू शकता-त्याचा सल्ला, सुधारणूक आणि प्रोत्साहन.
आणि मोशेने परमेश्वराचे सर्व वचन लिहिले. (निर्गम २४: ४)
आपण नेहमीच जे आपल्यासाठी महत्वाचे आहे त्याची नोंद करतो. मी विश्वास ठेवतो की, परमेश्वराकडून सतत ऐकत राहण्याचा सर्वांत महत्वाचा मार्ग हा कि जे काही तो बोलत आहे ते सर्व लिहून ठेवणे आहे. हे परमेश्वराला एक सुचना पाठविते की जे तो आपल्याला बोलत आहे, जे तो आपल्याला दाखवीत आहे, आपल्याला त्याची किंमत आहे.
त्यांनी इस्राएलाच्या देवाला पाहिले; त्याच्या पायाखाली इंद्रनील मण्यांच्या चबुतऱ्यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखेस्वच्छ होते. (निर्गम २४: १०)
ते काय दृश्य असेन? काय सौभाग्य असेन कीइस्राएलच्या परमेश्वराला पाहावे.
परमेश्वराच्या पायाखाली इंद्रनील मण्यांच्या चबुतऱ्यासारखे काही होते. हे जसे काही त्यासारखे होते की ते काहीतरी नवीन स्तर पाहू शकत होते.
पण इस्राएल लोकांच्या सरदारांवर त्याने हात उगारिला नाही; [त्यांच्यापासून स्वतःला लपवून ठेवावे, त्यांच्या निडरपणाला झिडकारावे, किंवा त्यांना हाणी पोहोचावी.] त्यांना देवाचे दर्शन झाले [प्रकटीकरण आणि त्याची उपस्थिती]आणि त्यांनी खाणेपिणे केले. (निर्गम २४: ११)
प्रेषित पौलाने परमेश्वराचे प्रकटीकरण पाहिले आणि त्याने अन्न आणिपाण्यावाचून तीन दिवस आणि तीन रात्री उपास केला. (प्रेषित९: ९)
तसेच, परमेश्वराने त्यांना जिवंत मारले नाही कारण कोणी मनुष्य देवाला पाहून जिवंत राहू शकत नाही.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पर्वत चढून माझ्याकडे ये व येथे राहा; मी तुला दगडी पाटया आणि लोकांच्या शिक्षणाकरिता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो. (निर्गम २४: १२)
विषयाबद्दलशिकविण्याची माहिती मोशेला पर्वतावर दिली गेली. तशाच प्रकारे एका संदेशकारने परमेश्वराकडून संदेश प्रचार करण्यासाठी विषयाबाबत माहितीघेतली पाहिजे-त्याच्या उपस्थितीच्या पर्वतावर.
तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावरगेला. (निर्गम २४: १३)
मोशे जो देवाचा मनुष्य होता त्याला एक साहाय्यक होता. म्हणून प्रत्येक पुढाऱ्याला एक साहाय्यक असला पाहिजे. उत्तराधिकारी शिवाय यश हे अपयश असे आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०