पावसाच्या दिवशी मेघांत दिसणाऱ्या धनुष्यांप्रमाणे त्यांच्याभोवती प्रभा फाकलेली मला दिसली; परमेश्वराच्या तेजाचे हे दर्शन होते. मी ते पाहून उपडा पडलो व कोणा बोलणाऱ्याची वाणी माझ्या कानी आली. (यहेज्केल १:२८)
मेघात दिसणारे धनुष्य हे पृथ्वीवरील लोकांसाठी देवाचे आश्वासन आहे. हे धनुष्य देवाच्या सिंहासनाभोवती घेरा करून असते.
मेघधनुष्याचा खरा अर्थ हा उत्पत्ति ९:१२-१५ मध्ये प्रगट केला आहे:
"देव म्हणाला, माझ्यामध्ये व तुमच्यामध्ये, त्या प्रमाणेच तुम्हांबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या, युगानुयुग राहणारा जो करार मी करीत आहे त्याचे चिन्ह हे: मी मेघांत धनुष्य ठेविले आहे, ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह होईल. मी पृथ्वीच्या वरती मेघ पसरीन व त्यांत धनुष्य दिसेल, तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही व सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन, आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करील असा जलप्रलय होणार नाही."
प्रथम, मेघ धनुष्याचा करार हा परमेश्वर आणि मनुष्य आणि प्राणी जे नोहा बरोबर तारवात होते त्यांच्याबरोबर झाला होता:
एकआश्वासनकीअशी घटना जी पृथ्वीवरील सर्व मानव व प्राणी यांना नष्ट करेल अशी होणार नाही. जसे तेव्हापासून अनेक स्थानिक पूर होऊन गेले, ते उघडच आश्वासन होते की सर्व मानवजातीचा नाश करील असा प्रलय कधी होणार नाही.
चाके काय होते?
चाके ही "चार जीवित प्राण्यांसंबंधित" होती (यहेज्केल १:४), त्यास नंतर करुबीम असे वर्णन केले आहे (यहेज्केल १०:५, २०), दुतांसारखे जीव ज्यांस देवाच्या पवित्रतेचे रक्षक असे नियुक्त केलेले आहे.
प्रत्येक चाक हे प्रत्यक्षात दोघांमध्ये एक असे होते, ज्यात एक हे दुसऱ्याच्या आत योग्य कोणात स्थित केलेले होते, ज्यामुळे त्या "जीवित प्राण्याला" न वळता कोणत्याही दिशेने ताबडतोब जाण्यास साहाय्य करीत होते, जसे विजेच्या वेगाने.
यहेज्केल चा दृष्टांत देवाला एक रथा-समान सिंहासन असे सादर करते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८