परमेश्वराचे वचन पुनः मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, सोरेसंबंधाने विलाप कर; तिला सांग, प्रभु परमेश्वर म्हणतो, अगे सोरे, समुद्राच्या प्रवेशस्थानाजवळ बसलेल्ये, अनेक द्विपांशी राष्ट्रांचा व्यापार चालविणारे; तूं म्हणतेस, मी सौंदर्याची खाण आहे.(यहेज्केल २७:१-३)
जसे यहेज्केल २६:१-२ येथे नोंदले आहे, फुनिके, जे इस्राएल च्या उत्तरेला आहे, तेथील सोर हे प्रसिद्ध व्यापारी शहर होते.
यावान, तुबाल व मेशेख हे तुजबरोबर व्यापार करीत; तुझ्या मालाचा मोबदला म्हणून ते तुला माणसे व पितळेची भांडी देत. (यहेज्केल २७:१३)
ते मानवी जीवनाचा सुद्धा सौदा करीत होते. हे मनुष्याला गुलाम म्हणून विकत घेणे व विकण्याचा संदर्भ असू शकतो. किंवा त्यापेक्षा अधिक भयंकर पापमय असू शकते.
तुझ्या सैन्याची पारसी, लूदी वपूटी हे तुझे लढवय्ये असत;
ते तुझ्यात आपल्या ढाली व शिरस्त्राणे टांगीत;
ते तुला तेजस्वी करीत.
अर्वदचे लोक तुझ्या सैन्यासह तुझ्या तटावर सभोवार असत; तुझ्या बुरुजांवर शूर पुरुष असत;
ते तुझ्या तटांवर चोहोंकडे आपल्या ढाली टांगून तुला सौदर्ययुक्त करीत. (यहेज्केल २७:१०-११)
अनेक राष्ट्रांकडील लोक हे त्यांच्या सेनेचे सहकारी होते-भाडोत्री सैनिक. एक भाडोत्री सैनिक हा तो व्यक्ति आहे जो सैन्याच्या लढाईत स्वतःच्या लाभासाठी भाग घेतो. ते सामान्यपणे काही मोल साठी काम करतात.
तूझ्या वल्हेकऱ्यांनीतुला खोल पाण्यात नेले; पूर्वेच्या वाऱ्याने तुला भर समुद्रात मोडून टाकिले. (यहेज्केल २७: २६)
पूर्वेचा वारा
बायबल मधील चार वाऱ्यांपैंकी, पूर्वेचा वारा हा अनेक वेळेला उल्लेखला आहे आणि तो सामान्यपणे फार प्रबळ, उष्ण व कोरडा वारा असे वर्णन केले आहे. उत्पत्ति चे पुस्तक (वचने ४१:६, ४१:२३, ४१:२७) धान्याचे वरील भाग झोडले जातात आणि मग ते पूर्वेच्या कडक वाऱ्याने विखरले जातात.
यहेज्केल चे पुस्तक (वचने १७:१०, १९: १२) सांगतेकी प्रबळ आणि उंच द्राक्षवेल उपटली जाते आणि ती पूर्वेच्या उष्ण कोरडया वाऱ्या द्वारे पूर्णपणे झोडली व वेगळी केली जाते.
बायबल मधील पूर्वेचा वारा हा एक प्रखर वारा सुद्धा आहे (यशया २७:८, ईयोब ३८:२४), ते जहाजाला महासागरात नष्ट करू शकते (स्तोत्रसंहिता ४८:७, यहेज्केल २७:२६), ते लोकांना विखरते आणि पूर्णपणे काढून टाकते (ईयोब १५:२, २७:२१, योना ४:८ यिर्मया १८:१७).
निर्गम चे पुस्तक वर्णनकरतेकी परमेश्वराने मिसर वर दहा वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा कशा आणल्या. सातवी पीडा ही गारांची पीडा होती आणि त्यानंतर पुढच्या दिवशी आठवी पीडा आली जी टोळ ची पीडा होती (निर्गम १०:१३). याचा क्रम असा होता की गारांच्या अतिवृष्टीने भूमीला अगोदरच भिजविले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी परमेश्वराने पूर्वेच्या वाऱ्याचा उपयोग केला की टोळ धाड आणावी, ज्यांस त्या भिजलेल्या मातीत अंडे घालण्यास योग्य वातावरण मिळाले आणि मग असंख्य असे वाढावे. जे काही गारांच्या वृष्टीने वाचले होते,ते टोळांनी पूर्णपणे खाऊन टाकले. पुढील दिवशी परमेश्वराने वाऱ्याची दिशा बदलली की एक प्रबळ दक्षिणीय वारा व्हावे. त्याने सर्व टोळ ला लाल समुद्रात घेऊन गेले आणि संपूर्ण मिसर मध्ये एकही टोळ उरली नाही. (निर्गम १०:१९)
प्रबळ आणि कोरडा पूर्वेचा वारायाने पुन्हा एकदा लाल समुद्र दुभागण्यासाठी एक मुख्य भूमिका पार पाडलीज्यामुळे इस्राएली लोक ते पार करू शकले परमेश्वराने प्रबळ पूर्वेचा वारा वापरला की समुद्राला मागे सरकवावे, आणि त्यास कोरडी भूमी करावी आणि पाण्याला दुभागावे (निर्गम १४:२१).
पूर्वेच्यावाऱ्याच्यासहज शक्तीद्वारे हे सर्व शक्य झाले होते, ज्यास अनेक वर्षे आठवले जात होते (स्तोत्रसंहिता ७८:२६).
होशेय च्या पुस्तकात, येथे एक इशारा आहे कीजो कोणी वाऱ्याची जोपासना करतो, संपूर्ण दिवस त्याच्यामागे लागतो आणि लबाडी व नाश यांची वृद्धि करतो (१२:१). परमेश्वराकडून पूर्वेचा वारा येईल, रानातूनशीळ घालून येईल; त्याचा वसंतऋतू अपयशी ठरेल आणि त्याची विहीर सुकून जाईल. त्याच्या निधीतील सर्व मनोरम वस्तू हरण करितील (१३:१५). होशेयह्या वचनात दुष्ट लोकांच्या फलहीन कृत्यांबद्दल बोलत आहे (८:७). त्यांनी वाऱ्याची पेरणी केली आणि वावटळीची कापणी केली.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८