परिचय
तेव्हा पाहा, कमरेनजीक कारकुनाचीदऊत असलेल्या व शुभ्र तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याने परत येऊन कळविले की तुझ्या आज्ञेप्रमाणे मी केले आहे (यहेज्केल ९:११). आता सहा संहारकर्त्यांची वेळ होती की त्यांच्या कार्याचा विस्तार हा मंदिराच्या अंगणाकडून यरुशलेम च्या इतर भागाकडे जावे.
तरीसुद्धा संपूर्ण १० व्या अध्यायामध्ये,देवाच्या ह्या कार्यकर्त्याचा उल्लेख केलेला नाही. ते त्या दृश्यामधून अदृश्य झालेले आहेत. केवळ एक मनुष्य जो तागाचे वस्त्र ल्यालेला आहे तो राहिला आहे. ह्या लाभदायक व्यक्तीला, तथापि, एक नवीन कार्य दिले गेलेले आहे. तो आता अग्नीच्या न्यायाचा कार्यवाहक झाला आहे. यरुशलेम ला तरवार आणि अग्नि द्वारे नष्ट करायचे आहे. न्यायाचे हे दोन दृष्टीकोन संदेष्ट्यालाअध्याय ९-१० मध्ये चित्रित केले गेले आहे.
करुबीम
जुन्या करारात करुबीम ला अनेक विविध कार्य दिले गेलेलेआहे. ते एदेन बाग च्या संबंधात प्रथम दिसले आहेत जेथे त्यांनी जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण केली आहे. (उत्पत्ति ३:२४)
शलमोनाच्या मंदिरात, त्यांनी परमपवित्रस्थानाची चिन्हात्मक राखण केली आहे (१ राजे ६:२३). त्यांना कराराच्या कोशाच्या झाकणावर त्याचे मस्तक लवलेले असे दाखविले आहे, आणि त्याची मुखे खाली दयासनाकडे पाहत आहेत जसे काही शांत भक्तीभाव मध्ये आहेत (निर्गम२५:१८-२०). यहेज्केल त्यांना त्यांच्या मुख्य भूमिका राखण करणारे ह्यामध्ये पाहत आहे. ते पवित्र अग्नीकडे जाण्याच्या मार्गाची राखण करीत आहेत.
पवित्र शास्त्राच्या अनेक उताऱ्यात, परमेश्वराला करुबीम वर विराजमान असे दाखविले आहे. कमीत कमी एका उताऱ्यात, परमेश्वर करुबीम वर स्वार झालेला आहे. (स्तोत्रसंहिता १८:१०)
मी पाहिले तो करुबावरल्या छतावर तृणमण्यासारखे काही दिसले, ते सिंहासनाच्या प्रतिमेसारखे होते. (यहेज्केल १०:१)
हे अगदी त्यासारखे होते जे कार्य करुबीम ने यहेज्केल च्या दृष्टांतात केले होते जेथे हे स्वर्गीय सत्व परमेश्वराच्या सिंहासनाला घेऊन आहेत आणि संपूर्ण सिंहासनाच्या-रथाला योग्य चालना देत आहेत.
मग परमेश्वर तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्यास म्हणाला, करुबाखाली चाकांच्या मध्ये जाऊन करुबांच्या मधून इंगळांनी आपली ओंजळ भर व ते नगरावर विखर, तेव्हा तो माझ्या देखत गेला.(यहेज्केल १०:२)
तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्यास आज्ञा दिली होती कीकरुबाखाली चाकांच्या मध्ये जावे आणि त्याच्या दोन्ही हातांनी जळते कोळसे घ्यावे जे त्याला तेथे दिसतात. (१:१३)
जळते कोळसे स्पष्टपणे न्यायाला चिन्हित करते. आणि दोन्ही हात त्या कार्यात उपयोगात आणले जे न्यायाची गंभीरता ज्याची वाट पाहत आहोतत्याकडे लक्ष नेते. त्या कार्यकर्त्याला तो कोळसा दुष्ट यरुशलेमे वर विखरण्यास सांगितले होते.
जसा दृष्टांत पुढे जात राहिला,यहेज्केल ने प्रत्यक्षात पाहिले की तो तागाचे वस्त्र ल्यालेल्या मनुष्याने ती आज्ञा पाळण्यास सुरु केली होती. ह्या दृष्टांताचे प्रतीकात्मक वर्तमान स्थितीत पाहणे हे उघड आहे. न्यायाचा अग्नि जो यरुशलेम वर येणार आहे तो इस्राएल च्या पवित्र व्यक्तीकडून येणार आहे.
ईश्वरविज्ञानाची शोकांतिका आहे जे याचा नकार करतात की परमेश्वर कसे त्याच्या शहरा विरुद्ध होईल जेथे तो करुबीम च्या मध्य विराजमान होता. बाबेल मधी बंदी लोकांनी यहेज्केल चे ऐकले नाही [किंवा ऐकणार नाही]. हे अविश्वसनीय सत्य संदेष्ट्याने आवेशाने म्हटले की याव्हे परमेश्वर यरुशलेम चा विनाश करेल.
सहा वर्षा नंतर, जेव्हा यरुशलेम ने अग्निद्वारे भयानक बाप्तिस्माप्राप्त केला, केवळ काहींनी ते ओळखले की तो देवाचा अग्नि होता. ते थोडे हे यहेज्केल सारख्या मनुष्यांच्या प्रचाराद्वारे तयार केलेले होते.
मग त्या करुबांपैकी एकाने आपला हात लांबवून करुबांमधल्या विस्तवास तो लाविला; त्याने त्यांतून काही इंगळ घेऊन तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याच्या हातात दिले; तो ते घेऊन निघून देला. (यहेज्केल १०:७)
तागाचे वस्त्र ल्यालेल्या मनुष्याला न्याय करणे आणि न्यायास कार्यान्वित करण्याचा अधिकार देण्यात आला होता.
यरुशलेमेचे जाळण्याचा दृष्टांत आणि चिन्हात्मक रूप सादर होणे हे ५८६ ख्रिस्तपूर्व काळात पूर्ण झाले.
मी पाहिले तो प्रत्येक करुबाच्या बाजूस एक अशी सगळ्या करुबांच्या बाजूस चार चाके होती; ती चाके वैडूर्यमण्यांसारखी दिसत होती. दिसावयाला त्या चार चाकांचा डौल सारखा होता;
ती जशी काय चाकाआड चाक अशी होती. ते चालत तेव्हा चारी दिशांपैकी पाहिजे त्या दिशेस जात; चालताना वळत नसत; प्रत्येक मस्तकाच्या कोणत्याही रोखाने ते जात;
चालताना वळत नसत. त्यांचे सर्व शरीर, पाठ, हात, पंक व चार चाके यांस सर्वत्र डोळे होते. चाकास गरगर फिरणारी चाके असे म्हटलेले मी ऐकले. (यहेज्केल १०:९-१३)
चाक साठी इब्री शब्द हा गलगल आहे
शब्दशः त्याचा अर्थ चाके, वावटळ, चक्रवात
ही वचने आपल्याला परमेश्वराच्या सिंहासन-रथाचे वर्णन करते.
येथे अनेक डोळे आहेत, जसे पवित्र शास्त्रामध्ये नेहमीच दाखविले आहे, जे त्याचे सर्वज्ञानीअसण्याचे प्रतीक आहे.
चाकांचेस्पष्टीकरण यहेज्केल च्या ऐकण्यात एक रथ [हगालगल]असे वर्णन केले आहे.
त्या प्रत्येकांस चार मुखे होती; पहिले मुख करुबाच्या मुखासारखे होते, दुसरे मनुष्याच्या मुखासारखे होते, तिसरे सिंहाच्या मुखासारखे होते व चौथे गरुडाच्या मुखासारखे होते.
ते करूब उडून वर गेले; मी खबारनदीच्या तीरी पाहिला तो हा प्राणी होय. करूब चालले म्हणजे चाके त्याच्याबरोबर चालत आणि भूमीवरून उंच उडण्यासाठी ते आपले पंख उचलीत तेव्हा ती चाके वेगळी होत नसत; ते थांबले म्हणजे ती थांबत; ते वर उडाले म्हणजे त्यांबरोबर ती वर जात; कारण त्या प्राण्यांचा आत्मा त्यात होता. (यहेज्केल १०:१४-१७)
ह्यापैंकी तीन चेहरे ही अध्याय १ मध्ये जसे पाहिले होते तसेच होते-मनुष्य, सिंह आणि गरुड.बैलाचेमुख (१:१०), तथापि, आता करूब असे वर्णन केले होते.
अध्याय १ मध्ये, हे मुख हे क्रमाने तिसरे होते; येथे ते प्रथम होते. बैला सारखे मुख जे सरळ पाहते हे अशा प्रकारे मुख्य आहे असा अनुमान करतात किंवा प्रत्येक करुबाचे खरे मुख आहे.
निघून जाण्याची सुरुवात (१०:१८): तेव्हापरमेश्वराचे तेज मंदिराच्या उबराठ्यावरून निघून करुबावर जाऊन राहिले. स्वर्गीय आदेशासाठी सिंहासन-रथ हे तयार होते. गौरवी मेघाने त्याचे स्थान पुन्हात्या सिंहासनावर घेतले.
निघण्याचा मार्ग (१०:१९): करुबांनी त्यांचे पंख उचलिले. ते माझ्यादेखत भूमीवरून वर चढून गेले. जेव्हा ते गेले तेव्हा चाके हे त्यांच्याबरोबर होती. ते परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वद्वारापुढे थांबले.
त्यांच्यावर इस्राएलाच्या देवाचे तेज होते. निघण्याचा मार्ग हा मंदिराच्या पूर्वद्वाराद्वारे होता, जेथे सिंहासन-रथ काही क्षण थांबले. पूर्वेचे द्वार हे सर्वात महत्वाचे द्वार आहे कारण ते मंदिराच्या समोर आहे.
पूर्व द्वाराजवळ क्षणभर थांबणे हे दैवी तेज निघून जाणे यापेक्षा अधिक काहीही महत्त्व नाही. निघून जाणे हे नगराच्या विनाशासाठी मार्ग मोकळा करते. ह्याच द्वार द्वारे, यहेज्केल नंतर पाहणार आहे कीपरमेश्वराचेतेज त्याच्या मंदिरात परत येणार आहे. (४३:४)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८