हृदयात मूर्ति
इस्राएलाच्या वडिलांपैकी कित्येक मनुष्ये मजकडे येऊन माझ्यासमोर बसली. तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, ह्या मनुष्यांनी आपल्या हृदयात आपल्या मूर्ति वागविल्या आहेत; त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेविले आहे; अशा लोकांस मी आपल्याला प्रश्न विचारू देईन काय? (यहेज्केल १४:१-३)
मानवपुत्रा, ह्या मनुष्यांनी आपल्या हृदयात आपल्या मूर्ति वागविल्या आहेत
हृदयात मूर्ति ह्या बाहेर मूर्ति असण्यापेक्षा अत्यंत धोकादायक अशा आहेत.
ज्या मूर्ति बाहेर आहेत त्या आम्ही काढून टाकल्या आहेत परंतु आतमध्ये अजूनही काही मुर्त्या आहेत.
मुर्त्या ज्या बाहेर आहेत त्या दिसू शकतात परंतु हृदयातील मुर्त्या ह्या मनुष्यांच्या दृष्टीपासून लपलेल्या आहेत
तथापि ते देवाच्या नेत्रांपासून लपलेल्या नाहीत.
अशी कोणताही सृष्ट वस्तू त्याच्या दृष्टीपासून लपलेली नाही, तर त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे ज्यांस आपल्याला हिशोब द्यायचा आहे. (इब्री ४:१३)
त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेविले आहे
ह्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अडखळण्यास कारणीभूत आहेत. ह्या अडखळण आणणाऱ्या गोष्टी आहेत
ह्या मुर्त्या आपल्या मार्गात सावट निर्माण करीत आहेत.
मुर्त्या काय आहेत?
कोणताहीव्यक्ति किंवा वस्तू जे तुमच्या हृदयात देवाचे स्थान घेते ते मूर्ति झाले आहे.
ज्या कशालाही तुम्ही देवा अगोदर किंवा देवाच्या बरोबरीने [त्याच स्तरावर] ठेवले आहे ते मूर्ति झाले आहे.
जो भक्तीभाव तुम्ही देवाला देत आहात ज्याक्षणी तो कोणा व्यक्ति किंवा वस्तूला तुम्ही देता, ते अदलाबदली करणे हे मूर्ति होते.
त्याद्वारे मी माझ्या स्वतःची चौकशी सुद्धा होऊ दयावी असे व्हायला पाहिजे काय
हे सुद्धा एक मुख्य कारण आहे की आपण देवाची वाणी का ऐकू शकत नाही
माझी मेंढरे माझी आणि ऐकतात
जरतुम्ही त्याची वाणी ऐकत नाहीत तर तेथे तुमच्या हृदयात काही मूर्ति असू शकतात.
देवाचे सिंहासन हे नेहमीच त्याच्या लोकांच्या हृदयात आहे. त्यामुळेच आपण आपल्या हृदयातून त्या कोणत्याही गोष्टी काढून टाकाव्यात जे आपले त्याच्याबरोबर संतुष्ट असणे नष्ट करते.
प्रार्थना#१
(तुमच्या छातीवर तुमचे हात ठेवा आणि प्रार्थना करा) परमेश्वरा माझ्या हृदयातील मूर्ति मला दाखीव.
अनेक एकटे असणाऱ्या व्यक्तींनी परमेश्वराकडे प्रार्थना करण्याअगोदर की त्यांनी कोणाबरोबर विवाह करावा त्यांनी त्यांना कशा प्रकारच्या व्यक्तीबरोबर विवाह करावयाचा आहे त्याबद्दल मनातअगोदरच विचार केला आहे. त्याचा परिणाम,त्यांच्या जीवनासाठी देवाची इच्छा स्वीकारण्यास त्यांना कठीण होते. परमेश्वर शेवटी, ज्या मूर्ति त्यांना पाहिजे असतात ते देतो. प्रार्थनेच्याह्या मुद्दयावर प्रार्थना करा: "हे परमेश्वरा, मला गुप्त मूर्ति पासून सोडीव, येशूच्या नांवात."
आधुनिक जगातील मुर्त्या
१. पैसा-उपासने साठी या. मला काही पैसे कमवू दया आणि मग मी येईल. ह्या मनुष्याला काही आजार झाला आणि त्या कारणामुळे जे काही त्याने कमाविले होते ते सर्व खर्च (कदाचित जास्त)केले.
२. प्रसिद्धी
जरी संपूर्ण जग तुम्हाला ओळखत असेन आणि जर परमेश्वर तुम्हाला ओळखत नसेल, तर तुम्ही तुमच्या जीवनास वाया घालवित आहात.
३. सेवाकार्य हे मूर्ति होऊ शकते
"मला प्रभुजी, प्रभुजी, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यांत होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नांवाने संदेश दिला, तुझ्या नांवाने भुते घालविली व तुझ्या नांवाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्यापुढून निघून जा." (मत्तय ७:२१-२३)
४. हृदयात क्षमाहीन असणे हे मूर्ति आहे
काही लोक त्यांचे पाळक, त्यांच्या गटाचे पुढारी, त्यांच्या स्वतःच्या कुटुंबांच्या सदस्यांना कधी क्षमा करू शकत नाही.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८