तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तुझ्यापुढे जे आले आहे ते सेवन कर; हा पट सेवन कर व जाऊन इस्राएल घराण्याबरोबर बोल. (यहेज्केल३:१)
परमेश्वर यहेज्केल ला चार गोष्ठी करण्यास सांगत आहे.
१. त्यास खावयाचे आहे
२. खा
३. जा
४. बोल
त्यास हा पट खावयाचा आहे. याचा अर्थ देवाचे वचन हे कोणा द्वारे अंत:करणात घेणे, समजणे आणि आत्मसात करण्याची गरज आहे, जे देवाचे संदेशकार म्हणून सेवा करणार आहेत. यहेज्केल ने स्वतः संदेश झाले पाहिजे.
पट खाणे या आदेशाच्या मुळाशी येणे म्हणजे हा तो आदेश आहे की इस्राएलच्या घराण्याकडे जाऊन बोलायचे आहे. वचन प्राप्त केल्यानंतर ताबडतोब, तेथे त्याची घोषणा केली पाहिजे.
म्हणून मी तोंड उघडिले, आणि त्याने मला तो पट खावयास लावला.
यहेज्केल ने परमेश्वराच्या आज्ञेला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याचे मुख उघडिले. ह्यावेळेला आपण देवाची कृपा कार्यरत आहे हे पाहतो, "त्याने मला पट खावयास लावले", जेव्हा आपण त्याचे वचन पाळण्याचा प्रयत्न किंवातसेपाऊल उचलतो, त्याची कृपा ही आपल्याला उपलब्ध असते.
तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जो पट मी तुला देतो तो पोटात जाऊ दे, त्याने आपली आतडी भर, मी तो सेवन केला तो तो माझ्या तोंडात मधासारखा मधुर लागला.(यहेज्केल३:३)
कोणी एकाने मला एक प्रश्न विचारला: वचनाचे किती अध्याय मी वाचले पाहिजे? मी किती वचन वाचले पाहिजे. आपल्या प्रत्येकाची भूक भिन्न आहे. तोपर्यंत खा जोपर्यंत पोट भरीत नाही. तोपर्यंत खा जोपर्यंत तुम्ही समाधानी होत नाही. वाचा जोपर्यंत तुमचे पोट हे भरत नाही.
तुम्ही देवाच्या लोकांना बोलण्याअगोदर, वचनाचा प्रचार करण्याअगोदर, तुम्हाला वचन खाल्ले पाहिजे. दुसऱ्या शब्दात स्वतःला देवाच्या वचनाने भरले पाहिजे. मी विश्वास ठेवतो की परमेश्वर यहेज्केलला बोलत आहे, स्वतःचे भरण कर, तुझ्या पोटभर खा, वचन पचवून घे किंवा वचन आत्मसात करून घे.
मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्यांजवळ माझी वचने बोल. कारण बाबर ओठांच्या व जड जिभेच्या लोकांकडे नव्हे, तर इस्राएल घराण्याकडे मी तुला पाठवितो; ज्यांचीबोली तुला समजत नाही अशी बाबर ओठांची व जड जिभेची अनेक राष्ट्रे आहेत, त्यांकडे मी तुला पाठवीत नाही. त्याकडे मी तुला पाठविले असते तर खरोखर त्यांनी तुझे ऐकले असते; पण इस्राएल घराणे तुझे ऐकणार नाही, कारण माझे ते ऐकणार नाही; इस्राएलाचे सगळे घराणे कठीण कपाळाचे व कठीण हृदयाचे आहे.(यहेज्केल३:४-७)
योना प्रमाणे नाही, यहेज्केल ला त्या लोकांकडे पाठविले नाही ज्यांची भाषा तो समजू शकत नाही.
किती अधिक की जे भक्तिमान आहेत असा दावा करतात ते सत्याचा प्रत्यक्षात अभ्यास करण्यावाचून किंवा ते समजण्याची इच्छा करण्यावाचून स्वतःच्या कल्पनेला धरून राहतात.
आपल्याच लोकांना संदेश देण्यापेक्षा बाहेरच्या लोकांना संदेश देणे बहुतेक करून सोपे जाते. जे आपलेच आहेत त्यांना वाटते की त्यांना सर्व काही ठाऊक आहे जेव्हा त्यांना काय समजण्याची गरज आहेहे त्यांना ठाऊक नसते.
पाहा, मी त्यांच्या मुद्रेसारखी तुझी मुद्रा वज्रप्राय करितो, त्यांच्या कपाळासारखे तुझे कपाळ कठीण करितो. मी तुझे डोके गारगोटीपेक्षा वज्रप्राय कठीण करितो; त्यांस तूं भिऊ नको, त्यांच्या कटाक्षांनी कापू नको; ती तर फितुरी जात आहे.(यहेज्केल३:८-९)
दैवी सामर्थ्याचा पुरवठा यहेज्केल ला देण्यात आला. वचन प्रचार करण्यास कोणास दैवी सामर्थ्याची गरज लागते. वचन प्रचार करण्यास सर्वात मोठा एक अडथळा की तुमच्या भीतीवर वर्चस्व करावे.
आणखी तो मला म्हणाला, मानवपुत्रा, जी सर्व वचने मी तुला सांगतो ती आपल्या हृदयात साठीव, ती कानाने ऐक.(यहेज्केल३:१०)
वचनाचा प्रचार करणाऱ्याचे आध्यात्मिक कान उघडे असले पाहिजे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८