दाखला
परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, इस्राएल घराण्यास कोडे घाल, हा दृष्टांत कथन कर.
त्यांस असे सांग, प्रभु परमेश्वर म्हणतो,
मोठाल्या पंखांचा, लांब पिसाऱ्याचा व चित्रविचित्र पिसांनी युक्त असा एक मोठा गरुड लबानोन पर्वतावर आला;
त्याने गंधसरुची शेंड्याकडील एक डहाळी तोडून घेतली
त्याने त्यातली अगदी वरची डहाळी तोडूनव्यापाऱ्याच्या देशात नेली
वा सौदागरांच्या एका शहरात लाविली
त्याने देशांतले काही बी घेऊन ते पिकाऊ जमिनीत पेरिले,
वाळूंज लावितात तसे ते विपुल पाण्याजवळ लाविले.
ते वाढून त्याची आखूड पण पसरलेली अशी द्राक्षालता झाली;
तिच्या फांद्या त्या गरुडाकडे झुकलेल्या असून तिची मुळे त्यांच्याखाली गेली होती
तीवाढून मोठी द्राक्षी झाली
तिला फांद्या फुटल्या व पाला आला.
दुसरा एक मोठा गरुड होता, त्याला फार पिसे होती व मोठाले पंख होत,
पाहा,त्याने लाविलेल्या वाफ्यांतून आपणांस पाणी मिळावे म्हणून त्या द्राक्षीने
आपली मुळे त्याकडे वाकविली व आपल्या फांद्या त्याकडे झुकविल्या.
त्या रोप्यांस फांद्या फुटून तो फळास यावा
आणि त्याची भव्य द्राक्षी व्हावी म्हणून तो एक सुपीक मळ्यात
विपुल पाण्याजवळ लाविला होता.
प्रभु परमेश्वर म्हणतो, सांग बरे, ती जीव धरील काय?
ती सुकून जावी म्हणून तुला मुळासकटउपटून तिची फळे तोडून
टाकणार नाही काय?
तिची सर्व नवी पालवी वाळून जाईल;
तिची मुळे उपटून टाकावयाला मोठे सामर्थ्य किंवा पुष्कळ लोक लागणार नाहीत.
पाहा, तिची लागवड झाली तरी ती जीव धरील काय?
पूर्वेकडील वारा तिला लागला म्हणजे ती सुकणार नाही काय?
ती ज्या वाफ्यांत वाढली त्यांतच ती मारून जाईल.
ह्या दाखल्याचा अर्थ आणि लागुकरण
पुनः परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, या बंडखोर घराण्यास सांग, या गोष्टी काय आहेत हे तुम्हांस समजत नाही काय? त्यांस सांग की पाहा, बाबेलच्या राजाने यरुशलेमेस येऊन तीचा राजा व तिचे सरदार यांस धरिले व आपणाकडे बाबेल येथे आणिले.(यहेज्केल १७:११-१२)
यहेज्केल ने त्याचे हे कोडे/दाखल्याचा अर्थ सांगितला, म्हणून त्याच्या ऐकणाऱ्यांनी हा बहाणा केला नाही की ते त्यास समजू शकले नाहीत.
मोठा गरुड बाबेल च्या राजाला प्रतिनिधित करतो.(यहेज्केल १७:३)
लबानोन यरुशलेम ला प्रतिनिधित करते.(यहेज्केल १७:३)
गंधसरुची सर्वात वरची डहाळी यहूदा चे राजे [यहोयाकीम] आणि राजकुमार ला प्रतिनिधित करतात.(यहेज्केल १७:३)
बी आणि द्राक्षी हे राजाच्या[सिद्कीया]मुलाबाळांना प्रतिनिधित करते.(यहेज्केल १७:५, ६)
पहिल्या गरुडाने सिद्कीया बरोबर करार केला आणि त्यास शपथेखाली आणविले.
पहिल्या गरुडाने देशाच्या शूरवीरांना घेतले, केवळ राजा सिद्कीया नव्हे तर इतर प्रसिद्ध पुरुष सुद्धा जसे दानीएल आणि त्याचे जोडीदार. त्यानेअसे केले की सिद्कीयाला कमकुवत करावे, म्हणजे सिद्कीया त्याचा करार हा पाळेन.
बाबेलच्या राजाने त्यांस त्याच्याबरोबर बाबेल ला नेले, ज्यास व्यापाराचे शहर म्हणत होते.(यहेज्केल १७:४)
जसे द्राक्षलतेने त्याचे मूळ आणि फांद्या दुसऱ्या गरुडाकडे नेल्या, म्हणून सिद्कीयाने त्याचे दूत मिसर ला पाठविण्याद्वारे त्याच्याविरुद्ध बंडखोरी केली, जे दुसऱ्या गरुडाला प्रतिनिधित करते. सिद्कीयाने मिसरकडून घोडे आणि अनेक लोकांची आशा केली.(यहेज्केल १७:७)
पण त्याने त्याजविरुद्ध फितुरी करू मिसर देशाने आपणांस घोडे व बहुत लोक दयावे म्हणून त्याजकडे आपले जासूद पाठविले. त्याला यश मिळेल काय? ज्याने अशी गोष्ट केली तो निभावेल काय? त्याने करार मोडला आहे तरी तो निभावेल काय?(यहेज्केल १७:१५)
मुलभूतरित्या सिद्कीया हा करार मोडणारा होता,नबुखद्द्नेस्सर, बाबेल चा राजा, यांसप्रामाणिक व अधीन होईन राहीन असे केलेल्या आश्वासनाकडेत्याने दुर्लक्ष केले होते (२ राजे २४:२०).
परमेश्वराने अपेक्षा केली होती की सिद्कीया ने नबुखद्द्नेस्सरशी केलेल्या कराराशी प्रामाणिकराहावे आणि त्याने जर तो करार मोडला तर त्यास शिक्षा होईल.
मी आपले जाळे त्याजवर टाकीन; तो माझ्या पाशात सापडेल; मी त्यांस बाबेलास नेईन; त्याने मजबरोबर केलेल्या विश्वासघातासंबंधाने तेथे मी त्याची झडती घेईन.(यहेज्केल १७:२०)
यिर्मया ५२:६-९ आपल्याला कथा सांगते कीसिद्कीया आणि राज्याचे मोठे सरदार ह्यांनी पळून जाण्याचा प्रयत्नकसा केला, जेव्हा बाबेलचे सैन्य यरुशलेम विरोधात आले होते. ते यशस्वी होऊ शकले नाही कारण परमेश्वराने त्याचे जाळे त्यांच्यावर पसरले होते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८