परमेश्वर त्याला म्हणाला, नगरामधून, यरुशलेममधून जाऊन जी माणसे आपल्यांत होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर. (यहेज्केल ९:४)
वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया यांची निखालस कत्तलकरा; पण ज्यांवर चिन्ह असेल त्यांस स्पर्श करू नका; माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा. तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला. [कोणाला त्यांच्या कपाळावर परमेश्वराचे चिन्हनाही आहे.](यहेज्केल ९:६)
कोणालाखूण मिळेल?
........जी माणसे आपल्यांत होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर चिन्ह कर.
एक शहर जे पूर्णपणे घृणास्पद कार्यामध्ये गुरफटलेले आहे तेथे अजूनही काही लोक आहेत जे होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकूनत्या शहरात विलाप करीत आहेत. ते धार्मिक लोक आहेत.
उत्पत्ति ४:१५ मध्ये, आपण पाहतो की परमेश्वर काइनाला म्हणत आहे, "तर मग जो कोणी काइनास ठार मारील त्याचा सातपट सूड घेण्यात येईल. आणि काइन कोणाला सापडल्यांस त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खूण नेमून दिली."
खूण ने काइनाला संरक्षण दिले, पण आपल्याला ठाऊक नाही की ती खूण काय होती.
जसे परमेश्वर त्याच्या लोकांवर खूण करतो तसेच सैतान त्याच्या लोकांवर खूण करतो.
प्रकटीकरण १३:१६ हे आपल्याला सांगते: "लहानथोर, धनवान, दरिद्री, स्वतंत्र व दास, ह्या सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खूण करून घ्यावी."
तुम्ही जगाचे असतां तर जगाने स्वकीयांवर प्रेम केले असते; परंतु तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे, म्हणून जग तुमचा द्वेष करिते. (योहान १५:१९)
तुम्ही जगाच्या लोकांपेक्षा वेगळे लोक असले पाहिजे. तुम्ही ह्या जगाच्या प्राथमिक सिद्धीतांशी बांधलेले नाहीत.
कोणती खूण परमेश्वर आपल्यावर करतो?
खुण ही पवित्र आत्म्याद्वारे अभिषेक होय.
तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हांवर त्याच्याठायी शिक्का मारण्यात आला आहे. (इफिस १:१३)
चिन्हाची का गरज आहे?
१. संरक्षण
ज्यांवर चिन्ह असेल त्यांस स्पर्श करू नका
येशू योहान १६:१३ मध्ये ते पुढे सांगत आहे, तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल; कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे काही ऐकेल, तेच सांगेल; आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील.
२. सर्व सत्यात मार्गदर्शन
तो येणाऱ्या गोष्टी तुम्हांला कळवील म्हणजे तुम्ही अगोदरच तयारी कराल.
वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया यांची निखालस कत्तलकरा; पण ज्यांवर चिन्ह असेल त्यांस स्पर्श करू नका;
माझ्या पवित्रस्थानापासून आरंभ करा. तेव्हा मंदिरापुढे असलेल्या वडिलांपासून त्यांनी आरंभ केला. [कोणाला त्यांच्या कपाळावर परमेश्वराचे चिन्हनाही आहे.](यहेज्केल ९:६)
परमेश्वराचा न्याय हा देवाच्या घराकडूनच सुरु होतो.
कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ [सुरु झाली]आली आहे; आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला, तर देवाच्या सुवार्तेचा [शुभवर्तमान] अवमान करणाऱ्यांचा शेवट काय होईल [असेल]? (१ पेत्र ४:१७)
[आत्मा] माझ्या कानात [दृष्टांतात]मोठया आवाजात आक्रोश करीत आहे, हे म्हणत, ज्यांना नगरावर अधिकार [संहार करण्याचा]आहे त्यांना सांगा जवळ या, त्या प्रत्येक मनुष्यानेत्याच्या हातात त्याच्या नष्ट करणाऱ्या शत्रासह यावे.(यहेज्केल ९:९)
सैतानी शक्ती ह्या नगराला नियंत्रण करीत आहेत याबद्दल आपण नेहमी बोलत असतो. तथापि, सत्य हे आहे की, दैवी शक्तींना प्रत्येक नगरासाठी नियुक्त केलेले आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८