"जे इस्राएलाचे मेंढपाळ आपणच चरतात त्यांस धिक्कार असो! मेंढपाळांनी कळपाला चारावे की नाही?" (यहेज्केल ३४:२)
जॉन सी. मैक्स्वेल यांना मी असे म्हणताना ऐकले, "सर्वकाही हे पुढारीपणावर उभारते आणि पतन पावते" दुसऱ्या शब्दात, चांगल्या गोष्टी होतात जेव्हा उच्च पदावर चांगले पुढारपण असते आणि वाईट गोष्टी होतात जेव्हा कारभारावर नियत्रण करणारे दुष्ट लोक असतात.
परमेश्वर ह्याबाबतीत सर्वकाही जाणून आहे, आणि म्हणून हेच तर कारण आहे की तो प्रथम पुढारीपण (मेंढपाळ) हाताळण्याद्वारे पुनर्स्थापनेची प्रक्रिया सुरु करतो. "इस्राएल च्या मेंढपाळ विरुद्धविषयी भविष्यवाणी".
"तुम्ही मेंढरांचे मांदे खाता, त्यांच्या लोकरीची वस्त्रे वापरीता; त्यांतलीलठ्ठलठ्ठ पाहून कापिता, परंतुकळपालाचारीत नाही."(यहेज्केल ३४:३)
मेंढरांच्या जिवावर ते विलासी जीवन जगतात. परंतु ते अजूनही त्यांचे पोषण करीत नाहीत, म्हणजे अनेक जनांची काळजी करणे (वचन ३).
यहेज्केल ३४:३-४
तुम्ही मेंढरांना चारले नाही......वचन
१. कमकुवत लोकांना तुम्ही बलशाली केले नाही.
२. ना ही जे आजारी आहेत त्यांनी तुम्ही स्वस्थ केले.
३. ना ही घायाळांचे घाय बांधले.
४.घालवून दिलेल्यास परत आणले नाही
५. हरवलेल्यास शोधले नाही.
परंतु तुम्हीं सक्तीने व कडकपणे त्यांजवर सत्ता चालविली.
यहेज्केल मेंढरांना पाच गटात विभागतो ज्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे: अशक्त, आजारी, घायाळ, भटकलेले, आणि हरविलेले.लोकसमुदायात हे गरीब आणि असमर्थ लोक आहेत. त्यांच्यावर सक्तीने सत्ता चालविली आहे, त्यांचा विचार करून आणि न्यायाने नाही. (मत्तय ९:३६).
त्यांस कोणी मेंढपाळ नसल्यामुळे त्यांची दाणादाण झाली; ती सर्व वनपशुंस भक्ष्य होईन त्यांची दाणादाण झाली.(यहेज्केल ३४:५)
वरील ही कारणे आहेतकी मेंढरे ही का विखरली गेली आहेत.
मी त्यास घडवेन, आणि माझ्या पर्वताजवळील ठिकाणे ही आशीर्वाद होतील आणि योग्य ऋतूत पाऊस पाठवीन आणि तेथे आशीर्वादाची वृष्टि होईल. (यहेज्केल ३४: १३,२६)
यहेज्केल २३: ११-१६, २३-२४
यहेज्केल आपल्या स्वर्गीय राजा ला एका मेंढपाळ प्रमाणे तुलना करीत आहे.
मेंढपाळ हे समाजातील बहिष्कृत लोक होते, महत्वाचे परंतु घाण कार्य करीत होते. ते साधारण मनुष्य होते,त्यांच्याजवळ त्यांची काठी आणि त्यांच्या खांद्यावर त्यांचे घोंगडे यापेक्षा अधिक काही नव्हते.
यहेज्केल येथे हे दाखवत आहे की, दोन कल्पना ह्या किती विभिन्न असू शकतात, चांगल्या स्वभावाचा राजा हा एक मेंढपाळ सुद्धा असू शकतो.
हेआपल्याला फारच ज्वलंत दिसते, परंतु हे चित्र कदाचित इस्राएल ने जतन करून ठेवले असेन. यहेज्केल येथे दावीद नाव वापरीत आहे, हे ह्या कारणासाठी नाही की ख्रिस्त हा दाविदाच्या वंशातून येणार आहे परंतु दावीद स्वतः सुद्धा एक मेंढपाळ राजा होता. दावीद शेतात वाढला होता आणि शेतातील साधेसरळपणा आणि राजवाड्यातील भव्यदिव्यपणा दोन्हीही त्यास ठाऊक होते. जी मेंढरे तो राखीत होता ते त्याच्या पित्याची होती आणि त्याचे भाऊ त्याचे वारस होणार होते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८