परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते असे: मानवपुत्रा, सेईर डोंगराकडे आपले तोंड कर व त्याविरुद्ध संदेश दे. (यहेज्केल ३५:१-२)
एदोम, याकोबाचा भाऊ एसाव चे वंशज, हेसेईर डोंगरावर प्रामुख्याने राहत होते. एदोमी लोकांविरुद्ध ही भविष्यवाणी होती.
"तूं कायमचे वैर धरिलेस आणि इस्राएल लोकांवर संकट आले तेव्हा, त्यांचा पापमूलक अंतसमय आला तेव्हा, त्यांस तरवारीच्या धारेच्या हवाली केले." (यहेज्केल ३५:५)
स्तोत्र ८३ मध्ये एदोम ची इस्राएलच्या शत्रुमध्ये प्रमुख अशी गणना आहे. एसाव च्या स्वतःच्या दिवसापासून, एदोमी लोकांमध्ये इस्राएल विरोधात एक प्रखर द्वेष हा निर्माण झालेला होता.
परमेश्वराने संदेष्टा आमोस द्वारे म्हटले होते, "परमेश्वर म्हणतो, अदोमाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; त्याने तरवार घेऊन आपल्या बंधूचा पाठलाग केला, त्याने आपला कळवळा दाबून टाकिला, तो आपल्या क्रोधाने एकसारखा तडफडत राहील; त्याने आपला संताप सतत ठेविला." (यहेज्केल ३५: ११)
शेवटच्या दिवसात इस्राएल लोकांविरुद्ध जर कोणी लोक उठून उभे ठाकले आणिकटकारस्थान योजील, तो एदोम असेल.
विष हे काहीतरी नाही जे तुम्ही नेहमीच खाता किंवा पिता-ते भावना सुद्धा असू शकते. आणि द्वेष हा त्यातील एक आहे, जे तुम्हाला आतून खाते आणि विनाश आणते. द्वेषाला हाताळले नाही तर तो तुमच्या आत्म्याला दूषित करेल आणि तुमच्या जिवाला विषारी करेल. जसे पाऊसाचे पाणी जमिनीत जाते, द्वेष हे आपल्या भोवतालच्या सर्व संबंधात फार सहजपणे घुसते.
तर द्वेष हा कोणत्याही बाबतीत केला जातो-प्राणी, अन्न, नोकरी, सिनेमा-सर्वात विनाशक हा इतर लोकांच्या विरोधात द्वेष करणे हे आहे.
एदोमाचे इस्राएल प्रती द्वेष यामुळे त्यांच्याविरुद्ध देवाच्या न्यायाला पेटविले.(यहेज्केल ३५:६-९)
कारण तूं म्हटले आहे, ही दोन राष्ट्रे, हे दोन देश माझे आहेत, आपणत्यांचा ताबा घेऊ, असे तेथे परमेश्वर असता तूं म्हणालास.(यहेज्केल ३५:१०)
जेव्हा बाबेल चे सैन्य यहूदा व यरुशलेम विरोधात आले, एदोमी लोकांनी त्यांचे क्षेत्र वाढवावे म्हणून ही संधी वापरली. त्यांच्या बंधूना साहाय्य करण्याऐवजी, त्यांनी इस्राएल च्या संकटाचा अयोग्य लाभ घेतला.
ते विसरले की जरी यहूदा हे त्यांच्या भूमीतून तात्पुरते बंदिवासात गेले आहेत, तरी परमेश्वर तेथे (यहोवा शामा)आहे.
तो त्याच्या भूमीचे बांडगुळांकडून संरक्षण करील व त्यास जतन करून ठेवील.
"म्हणून प्रभु परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, तूं जो द्वेष दाखविला, तूं त्यांचा द्वेष करून जो हेवा प्रगट केला, तदनुसार मी तुजबरोबर वागेन; मी न्याय करून तुला शासन करीन तेव्हा मी त्यांस प्रगट होईन." (यहेज्केल ३५:११)
हे ह्या पृथ्वीवर कोणत्याही राष्ट्रासाठी एक इशारा आहे जे देवाचे लोक-इस्राएलविरोधात येतील.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८