यहेज्केल ३८-३९ मध्ये बायबल मधील एक सर्वात भयानक युद्ध उल्लेखले आहे, त्यास सतत गोग आणि मागोग चे युद्ध असे संबोधतात. कधीकधी त्यास जागतिक युद्ध 3 असे सुद्धा म्हणतात. हे एकच युद्ध आहे ज्यात ख्रिस्ती, मुस्लीम आणि यहूदी- या सर्वांना त्यातून शिकवण आहे.
गोगआणि मागोग चे हे युद्ध काय आहे?
यहेज्केल च्या पुस्तकात भविष्यातील इस्राएल विरोधातील युद्धा बाबत एक सव्विस्तर वर्णन आहे. ह्या युद्धाला "गोग आणि मागोग चे युद्ध" म्हणतात कारण मागोग चे लोक आणि त्यांचा पुढारी गोग हे इस्राएल विरोधात आक्रमणास मार्गदर्शन करतील.
हे युद्ध इतके महत्वाचे का आहे?
हे विशेष युद्ध इस्राएल साठी एक नवीनवळण असेल, परमेश्वराबरोबरच्या त्यांच्या संबंधाच्याबाबत.
यहेज्केल ने राष्ट्रांची प्राचीन नावे लिहून ठेवली जसे ती त्यांस ठाऊक होती. ह्या नावांचा अर्थ समजण्यासाठी,आपल्याला पवित्र शास्त्र व इतिहासाचा उपयोग करून काही संशोधन करण्याची गरज आहे. अनेक भविष्यात्मक अभ्यास करणाऱ्या शिक्षकांनी आपल्यासाठी अगोदरच काही संशोधक कार्य केले आहे.
त्यान सांग, प्रभु परमेश्वर म्हणतो, पाहा, अरे गोगा, रोश, मेशेख व तुबाल यांच्या अधिपती (शासक), मी तुजविरुद्ध आहे. (यहेज्केल ३८:३)
वचन 3 मधील इब्री शब्द रोश, हा रशिया बरोबर जुळविला जातो, तुबाल हा तीब्लीसी किंवा तोबोल्क्स आणि मेशेख हा मॉस्को, त्यामुळे गोग आणि मागोग रशिया चा संदर्भ देतात.
त्यांसह ढाल व शिरस्त्राण धारण केलेले पारस, कूश व पूट, गोमर व त्याचा सेनासमूह, अगदी उत्तरेकडील तोगार्माचे घराणे व त्याचा सर्व सेनासमूह, तसेच अनेक जातीचे लोक यांस तुजसह बाहेर काढीन.(यहेज्केल ३८:५-६)
गोग आणि मागोग च्या युद्धात समावेश असलेली राष्ट्रे
उत्तरेच्या राष्ट्राचा मुख्य अधिपती
पर्शिया, लिबिया, इथिओपिया
शबा, ददान, आणि तार्शिश येथले व्यापारी व त्यांचे सर्व तरुण सिंह तुला म्हणतील, तूं लुटालूट करावयास आलास काय? तूं मालमत्ता हरण करण्यासाठी आपला सेनासमूह जमविला आहे काय? सोनेरूपे न्यावे, गुरेढोरे व माल न्यावा आणि मोठी लूट करावी म्हणून तूं आला आहेस काय? (यहेज्केल ३८:१३)
शबा ददान व अरब खाडीमधील राष्ट्रे- विशेषकरून तेल निर्माण करणारी खाडी राष्ट्रे
तार्शिश चे व्यापारी हे ब्रिटन आणि स्पेन चे क्षेत्र आहे
आणि त्यांचे सर्व तरुण सिंह-ब्रिटन चे चिन्ह जसे तुम्हाला ठाऊक आहे ते सिंह आहे आणि अमेरिका ही महान ब्रिटन मधून आली आहे.
याचा अर्थ काय असू शकतो की अरब चे खाडी राष्ट्र हे ह्या संघर्षात हात घालीत नाहीत.
युरोप चा पश्चीमीय टोकाचा भाग ह्या संघर्षात भाग घेत नाही.
हे समजणे महत्वाचे आहे की यहेज्केल मध्ये वर्णन केलेले युद्ध हे तेच युद्ध नाही जे महासंकटाच्या काळात येणार आहे जेव्हा येशू पुन्हा येणार आहे की ख्रिस्तविरोधकास पराभूत करावे आणि त्याचे हजार वर्षांचे राज्य स्थापित करावे. हे आपल्याला कसे समजते? महासंकटाच्या शेवटी जे युद्ध होणार आहे ज्यांस आर्मगिदोन, जागतिक युद्ध म्हणतात. प्रकटीकरण हे आपल्याला सांगते की ह्या युद्धात सर्व राष्ट्रे सामावलेली असणार. युद्ध जे यहेज्केल मध्ये वर्णन केले आहे त्यात विशेष राष्ट्रांचा उल्लेख केला आहे जे इस्राएल वर आक्रमण करतात.
तसेच, आर्मगिदोन चे युद्ध हे महासंकटाच्या शेवटी होणार आहे, तर यहेज्केल मध्ये वर्णन केलेले युद्ध हे त्याच्याअगोदर येते.
शबा व ददान ओळखण्यात कठीण नाही. ही प्राचीन नावे आहेत ज्यास आज सौदी अरेबियाम्हणतात.
मनोरंजकपणे, सौदी अरेबिया हेच केवळ एक राष्ट्र आहे जे इस्लामच्यामूलगामीघटकांविरुद्ध सतत पश्चिम बरोबर सहकार्य करीत आहे.अमेरिका हे गोग आणि मागोग च्या युद्धाचा हिस्सा असणार नाही.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८