जुन्या कराराच्या संदेष्ट्याद्वारे चिन्हात्मक कृतींचा वापर हा एक चांगले प्रेक्षक मिळविण्याचा आणि मुद्दा स्पष्ट करण्याचा सिद्ध मार्ग होता. महान संदेष्ट्ये यशया आणि यिर्मया यांनी चिन्हात्मक कृती ही एक उपयोगी साधन असे पाहिले जेव्हा त्यांचा संदेश लोकऐकू इच्छित नव्हते.
हे मानवपुत्रा, एक वीट घेऊन आपल्यासमोर मांड; तिच्यावर यरुशलेम नगरीचे चित्र काढ. तिला वेढा पडला आहे, तिच्यासमोर बुरुज रचून मोरचे बांधिले आहेत, तिच्यापुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्याभोवती लागली आहेत, असे चित्र काढ. मग तूं एक लोखंडी कढई घे; ती तुझ्यामध्ये व त्या नगरीमध्ये जशी काय लोखंडी भिंत म्हणून ठेव; तूं आपले तोंड तिच्याकडे कर; तिला वेढ्याच्या स्थितीत आण; तूं तिला वेढा घालणारा हो, हे इस्राएल घराण्यास चिन्ह होईल. (यहेज्केल ४:१-३)
जसे एक लेकरू चिखलामध्ये खेळत आहे, यहेज्केल ला परमेश्वराने त्यास वेढा पडला आहे असे एक चित्र काढावयास लाविले. ती कृती यहेज्केल ने कदाचित एका ठिकाणी केली जेथे अनेक हे (कदाचित एका बाजाराच्या ठिकाणी)पाहू शकत होते. जर ही कृती खाजगी केली असती, तर ती इतकी प्रभावी होऊ शकली नसती. मुद्दा हा की त्यातून संदेश प्राप्त करावा.
आणखी तू आपल्या डाव्या कुशीवर नीज व इस्राएल घराण्याचा अधर्म त्या कुशीवर ठेव; जितके दिवस तूं त्या कुशीवर निजून राहशील तितके दिवस त्यांच्या अधर्माचा भार वाहत राहा.
कारण त्यांच्या अधर्माच्या वर्षाइतके दिवस मी तुझ्या हिशोबी गणिले आहेत; तीनशे नव्वद दिवस तुला इस्राएल घराण्याचा भार वाहावयाचा आहे. पुनः ते दिवस संपल्यावर तूं उजव्या कुशीवर नीज व चाळीस दिवस यहूदा घराण्याच्या अधर्माचा भार वाहा; प्रत्येक वर्षाबद्दल तुझ्या हिशोबी मी एक दिवस धरिला आहे.(यहेज्केल ४:४-६)
संदेष्टा यहेज्केल ला त्याच्या डाव्या कुशीवर ३९० दिवस निजावयाचे होते आणि काही अज्ञात चिन्हात्मक मार्गाने इस्राएल घराण्याच्या अधर्माचा भार स्वतःवर ठेवायचा आहे.
इस्राएल घराण्यासाठी ३९० दिवसानंतर, संदेष्टा यहेज्केल ला आदेश होता की तसे ४० दिवसासाठी करावे की चिन्हात्मकदृष्टया यहूदाच्या घराण्याचा भार वाहावा.
ह्या सर्वांमध्ये सर्वात कठीण भाग हा वचन ८ होते.
आणि पाहा, मी तुला बंधनांनी बांधितो, म्हणजे तूं आपल्यावेढ्याचे दिवस संपविपर्यंत या कुशीचा त्या कुशीला वळावयाचा नाहीस.(यहेज्केल४:८)
ही कल्पना करणे कठीण आहे कीसंदेष्टा एक कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळण्यास असमर्थ होता कारण तसे करण्यापासून परमेश्वराने त्यास प्रतिबंध केला होता.
"तूं गहू, जव, पावटे, मसूर, बाजरी व काट्या गहू घेऊन एका पात्रात घाल, व आपल्यासाठी त्याची भाकर कर; तूं आपल्या कुशीवर निजशील त्या दिवसांच्या संख्येच्या मानाने तीनशे नव्वद दिवस तुला ती खावयाची आहे. तूं जे अन्न खाशील ते वजनाने रोजचे वीस शेकेल असुन तूं तें मधून मधून पी; जवाच्या भाकरीप्रमाणे ती भाकर करून खा; ती लोकांसमक्ष मानवी विष्ठेने भाज. परमेश्वर बोलला, याप्रमाणे मी इस्राएल वंशजांस ज्या राष्ट्रांत हाकून देईन त्यांत ते आपली अमंगळ भाकर खातील.(यहेज्केल ४:९-१३)
त्याच्या कुशीवर ३९० दिवस निजण्याच्या दरम्यान, यहेज्केल ला अनेक धान्याच्या कणांनी भाकरबनविणे आणि ती ह्या दिवसांत खाण्यास सांगितले. हे सुचविते की त्या दिवसांच्या दरम्यान, यहेज्केल पूर्णपणे कार्यहीन आणि त्याच्या कुशीवर सतत निजून राहिला नव्हता.
त्या समयाच्या अभावाच्या परिस्थितीत अनेक प्रकारचे जाडेभरडे धान्य हे बारीक कणा बरोबर मिसळले जात होते, की ती भाकर जास्त दिवस टिकून राहावी.
त्यांच्यासमक्ष(यहेज्केल ४:१२)
जे मी अगोदर उल्लेखिले आहे हे त्यास सिद्ध करते. संदेष्टा यहेज्केल ने ही कृती उघडपणे केलीकी ती सर्वांनी पाहावी.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८