चार घृणा
१. ईर्षेची प्रतिमा
यहेज्केल ला सांगितले होते की मंदिराच्या अंगना बाहेर आतल्या अंगणात एक ठिकाण पाहा. तेथे त्याने ईर्षेचीआणखी एक प्रतिमा पाहिली. अशी प्रतिमा ही दुष्ट होती. इस्राएल चा परमेश्वर अशा सर्व प्रतिमे द्वारे क्रोधात आला होता (यहेज्केल ८:३-५). मंदिराच्या क्षेत्रात त्या मूर्तीच्या उपस्थितीने परमेश्वराला ईर्षेस पेटविले होते; म्हणजे, स्वतःचा हक्क दाखविण्याची इच्छा कीन्यायी ठरवावे.
२. प्राणी उपासना
मी आत जाऊन पाहिले तो सरपटणारे प्राणी, अमंगळ पशु व इस्राएल घराण्याच्या सर्व मूर्ति यांची चित्रे भिंतीवर चोहोंकडे काढिलेली होती. (यहेज्केल ८:१०)
भित्ती, छत, आणि जमीन-खोलीचा प्रत्येक भाग हा ह्या सरपटणाऱ्या गोष्ठी व मूर्तिच्या चित्रांसह कोरलेले होते.
त्यांच्यापुढे इस्राएल घराण्याच्या वडिलांतले सत्तर पुरुष उभे असून त्यांजमध्ये याजन्या बिन शाफान हा उभा होता; त्या प्रत्येक माणसाच्या हाती धुपाटणे होते; तेथे धुपाच्या दात धुराचा परिमळ वर जात होता. (यहेज्केल ८:११)
यहेज्केल साठी हे विशेषकरून फारच भयानक असे दिसत होते कारण शाफान हा तोमनुष्य होता ज्यास योशीया च्या राज्यकारभारा दरम्यान अनेक वर्षांपूर्वी गहाळ झालेल्या नियमशास्त्राची गुंडाळी मिळाली होती. परंतु आता त्याचे पुत्र हे ह्या मूर्तिपुजकांबरोबर होते जे ह्या भयानक कक्षात लपलेले होते.
३. तम्मुज ची उपासना
तेव्हा त्याने मला परमेश्वराच्या मंदिराच्या उत्तरेच्या प्रवेशद्वाराजवळ आणले; आणि पाहा, तेथे स्त्रिया तम्मुज [बाबेल चा एक देव, ज्यास वर्षाला मरावयाचे होते आणि त्यानंतर पुनरुत्थित व्हायचे होते]साठी रडत होत्या.
पैलेस्टाईन मध्ये प्राचीन बाबेलच्या मूर्तिपूजक पंथा साठी हाच एक संदर्भ होता. तम्मुज हा अष्टरोथ चा पुत्र आणि/किंवा प्रेमी होता. तोहिरवळीचा देव होता. एक दंतकथेने शिकविले की तो मरण पावला आणि प्रत्येक ग्रीष्माच्या जगात गेला, कीवसंतऋतू मध्ये जिवंतांच्या जगतात परत यावे. जेव्हा हिरवळ नष्ट होते आणि नद्या सुकतात, तेव्हा तम्मुज च्या वार्षिक मृत्यूसाठीसार्वजनिकशोकगीतासह शोक केला जातो.
स्त्रिया अष्टरोथ बरोबर एक होतात जी तिच्या मेलेल्या प्रेमिकेसाठी ह्या तीव्र अवर्षण मध्ये शोक करीत आहे.
४. याजक
एका राष्ट्रासाठी समर्थन करण्याचा शेवटचा आधार हा याजक आहेज्यांनी लोकांना देवाचे वचन शिकवायचे होते. वचन हे त्यांना मोशे द्वारे लिहिलेल्या नियमशास्त्रात आणि उपासनेच्या मंदिराच्या पद्धतीत प्रगट केले गेले होते.
प्रार्थनेसाठी अडथळे
त्यामुळे मी संतापून करावयाचे ते करीन, मी त्यांजवर कृपादृष्टि करणार नाही; त्यांची गय करणार नाही; त्यांनी मोठयाने माझ्या कानी आरोळी मारली तरी मी त्यांचे ऐकणार नाही. (यहेज्केल ८:१८)
परमेश्वर ऐकणार नाही जर आपल्या जीवनात पापा बद्दल योग्य तो विचार केला गेला नाही.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८