वीरांमध्ये जे प्रमुख ते त्यांजबरोबर व त्याच्या सहाय्यकर्त्याबरोबर अधोलोकातून बोलतील; ते खाली उतरले आहेत; हे बेसुंती तरवारीने वध पावून तेथे पडले आहेत. (यहेज्केल ३२:२१)
उपहास येथे उघड आहे. इतिहासातील कोणतेही राष्ट्र मृत्युनंतरच्या जीवनाला अधिक महत्त्व देत नाही-स्पष्ट पिरामिड, जमिनीखालचे पुरलेले कक्ष; मसाले लावण्याची कला, प्रचंड संपत्ति गोळा करणे आणि येणाऱ्या जगात उदंड जीवनासाठी अमापपुरवठाजमा करणे. तथापि, ह्यापैकी कोणतेही हे सामर्थ्यशाली फारो ला खाडात लज्जाजनक स्थितीत जाण्यापासून रोखू शकत नाही.
"तेथे मेशेख, तुबाल व त्याचा सर्व समूह हे आहेत; त्याच्या कबरेभोवती त्यांच्या कबरा आहेत; त्यांनीजिवंतांची भूमि दहशतीने भरिली म्हणून ते सर्व बेसुंती इसम तरवारीने वध पावले.
बेसुंती लोकांपैकी जे वीर समरांगणात पडून शस्त्रास्त्रांसह अधोलोक ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहिले नाहीत काय? कारण जिवंतांच्या भूमीत ते वीरांस दहशत घालीत, म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांच्या ठायी आहेत.
तूं बेसुंती लोकांमध्ये भंग पावशील व तरवारीने वध पावलेल्यांबरोबर तूंही पडून राहशील. (यहेज्केल ३२: २६-२८)
यहेज्केल ३२: १७-३२ हा मनोरंजक उतारा आहे कारण हा काही राष्ट्रांचा उल्लेख करतो ज्यांच्याकडून अपेक्षा आहे की शेवटल्या समयी त्यांच्याकडे काही भूमिका असणार.
यहेज्केल ३२:२६-२८ मेशेख आणि तुबाल चा संदर्भ देते, जे यहेज्केल ३८ आणि ३९ मध्ये उल्लेखिले आहेत.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८