येथे दोन पहारेकऱ्यांचे वर्णन केले आहे
१. परिश्रमी पहारेकरी
२. निष्काळजी पहारेकरी
"तर हे मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्याचा पहारेकरी नेमिले आहे, म्हणून तूं माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यांस सावध कर." (यहेज्केल३३:७)
संदेष्टा हा पहारेकरी आहे. तो जे काही परमेश्वरापासून ऐकतो ते त्याने लोकांना सांगितले पाहिजे. ते कदाचित फारच कठीण असेन परंतु महत्वाचे.
"त्यांस सांग, प्रभु परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी दुर्जन मरावा यांत मला काही संतोष नाही तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे यांत मला संतोष आहे; फिरा, आपल्या मार्गावरून मागे फिरा; इस्राएल वंशजहो, तुम्ही का मरता?" (यहेज्केल३३:११)
परमेश्वर हा खुनशी नाही. त्याचे शत्रू पापात मरावे अशी त्याची इच्छा नाही. दैवी शिक्षा ही रचली गेली आहे की दुष्ट लोकांना पश्चातापाकडे वळवावे म्हणजे पापाच्या अंतिम परिणाम पासून त्यांनी वाचावे.
"तर हे मानवपुत्रा, तूं आपल्या बांधवांस सांग, धार्मिक पातक करील तर त्याची धार्मिकता त्याला मुक्त करणार नाही; आणि दुर्जन आपल्या पापमार्गावरून मागे फिरेल तर त्याच्या दुष्टतेमुळे त्याचे पतन होणार नाही; तसेच धार्मिक पाप करू लागला तर तो आपल्या धार्मिकतेमुळे वाचणार नाही.(यहेज्केल३३:१२)
मनुष्याचा भूतकाळ परमेश्वराबरोबरील भविष्यातीलसंबंध निश्चित करणार नाही. उदाहरणार्थ, जर कोणी मागे एकदा परमेश्वराच्या संगती पासून दूर गेला असेन तो शिक्षा चुकणार नाही. त्याप्रमाणेच, जर एक पश्चातापी पापी त्याच्या पापामुळे शिक्षा भोगणार नाही जर त्याने खरेच पश्चाताप केला आहे.
"तरी तुझे बांधव म्हणतात, प्रभूचा मार्ग नीट नाही; पण त्यांचेच मार्ग नीट नाहीत. कोणी धार्मिक आपल्या धार्मिकतेस मुकून पाप करू लागला तर त्यामुळे तो मरेलच. तथापि दुर्जन आपले दुराचरण सोडून नीतीने व न्यायाने वागला तर त्यामुळे तो वाचेल. तरी पण तुम्ही म्हणता की प्रभूचा मार्ग नीट नाही; अहो इस्राएल वंशजांनो, मी तुमचा प्रत्येकाचा न्याय तुमच्या मार्गाप्रमाणे करीन." (यहेज्केल ३३:१७-२०)
काही यहूदी वाद घालतात की यहेज्केल चे शिक्षण देवालाविसंगत असे चित्रित करेल. देवाचा मार्ग समान नाही, असे ते म्हटले.
धार्मिक मनुष्य त्याच्या धार्मिकतेवरून अवश्य वळतो आणि त्याचे परिणाम भोगतो (वचन १८). दुष्ट लोक कधीकधी पश्चाताप करतात आणि पुरस्काराचा लाभ घेतात (वचन १९).
परमेश्वर लोकांशी जसे ते वर्तमान मध्ये आहेत व्यवहार करतो, असे नाही की जे ते भूतकाळात होते (वचन २०).
तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, इस्राएल देशाच्या उजाड झालेल्या प्रदेशांत राहणारे असे म्हणत आहेत की अब्राहाम एक असून त्याला या देशाचे वतन मिळाले; आम्ही तर बहुत आहो आणि देश आम्हांस वतनादाखल दिला आहे. (यहेज्केल ३३:२३-२४)
यहेज्केल ने परमेश्वराकडून पुनः वचन प्राप्त केले (वचन २३). ते दयनीय उरलेल्या लोकांविषयी आहे, जे गदल्याच्या राज्यपालात यहूदाच्या अवशेष मध्ये राहिले होते. एकदाकी त्यांच्या भूमीचा विनाश झालेला पाहिला होता ते विसरून गेल्यावर, ते उरलेले गट ही कल्पना करू लागले की ते देवाची कृपा पावलेले लोक आहेत. तेउघडपणे विश्वास ठेवू लागले की नवीन राष्ट्रात ते मुख्य व्यक्ति असतील. ते ह्या विचाराने स्वतःचे समाधान करीत होते की मूळतः कनान देश हा एका व्यक्तीला, पूर्वज अब्राहाम ला देण्यात आला होता. परंतु आता त्या भूमीवर त्यांचा अधिक अधिकार आहे!
ते पुष्कळ होते, आणिते प्रत्यक्षात त्या भूमीवर राहत होते. ते त्यांचे नुकसान पुन्हा भरून आणण्यात समर्थ आहेत आणि त्या भूमीला पुन्हा उभारण्यात काही वेळ लागणार नाही (वचन २४).
"हे मानवपुत्रा, तुझे बांधव भिंतीजवळ, दरवाजाजवळ तुझ्याविषयी बोलत आहेत; एक दुसऱ्याला, भाऊ भावाला म्हणतो, चला, परमेश्वराकडून काय वचन आले ते ऐकू या.
जनसभेतल्याप्रमाणे ते तुजकडे येऊन माझ्या लोकांच्या रितीप्रमाणे तुजपुढे बसतात, ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत; ते तोंडाने गोडगोड गोष्टी बोलतात पण त्यांचे मन लोभवश झाले आहे; आणि पाहा एखादा मधूर कंठाचा व वाद्ये चांगली वाजविणारा प्रेमगीत गातो तसा तूं त्यांस वाटतोस कारण ते तुझी वचने ऐकतात पण त्याप्रमाणे चालत नाहीत.(यहेज्केल ३३:३०-३२)
परमेश्वराने यहेज्केल ला इस्राएल राष्ट्राचा पहारेकरी म्हणून बोलाविले होते. त्यास लोकांना येणाऱ्या न्यायाविषयी इशारा द्यायचा होता आणि लोकांना देवाकडे वळवायचे होते. जरी यहेज्केल ते सर्व विश्वासपूर्ण करीत होता जे त्याने करावे असे देवाला पाहिजे होते, अनेक लोकांनी त्यास केवळ आणखी एक मनुष्य असे पाहिले. त्यांनी त्याचा संदेश ऐकला आणि त्याविषयी काहीही केले नाही. त्यांनी त्याच्या संदेशाला एक मनोरंजन असे लेखले.
प्रत्येक आठवडे, संपूर्ण जगभर अशा लोकांनी भरलेले असतातजे दावा करतात की ते देवावर प्रेम करतात आणि त्याची सेवा करीत आहेत. काही'आमेन' सुद्धा ओरडतात आणि पाळकाला प्रोत्साहन देतात जेव्हा तो बोलत असतो.
अनेक हे त्यांचे मित्र आणि नातेवाईकांना त्यांच्या पाळकाचा संदेश ऐकण्यासाठी आमंत्रित सुद्धा करतात- कारण तो एक चांगला प्रचारक आहे. तथापि, ते संदेशा विषयी काहीही करीत नाहीत. हेत्यांच्यासाठी जसे काही आणखी एक मनोरंजनाचा प्रकार असतो.
"त्यांनी त्याचा संदेश ऐकला आणि त्याविषयी काहीही केले नाही."(यहेज्केल ३३:३२)
ते जे आपण दररोज बायबल वाचत आहोत त्यांच्यासाठी सुद्धा हा एक भविष्यात्मक इशारा आहे. हे वचन सांगते की कदाचित आपण काय करावे याविषयी वाचत असू परंतु आपण ते करीत नाही जे आपल्याला सतत माहीत आहे, हे केवळ वायफळ होते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८