"बायबल मधील इतर कोणताही अध्याय ह्या अध्याया (यहेज्केल २१)पेक्षाइतका प्रामुख्याने आणि पूर्णपणे देवाच्या तरवार विषयी बोलत नाही ज्यास तरवार चे गीत किंवा तरवार ची भविष्यवाणी असे म्हटले आहे." (चार्ल्स फेनबर्ग)
मानवपुत्रा, तूं संदेश देऊन टाळी वाजीव म्हणजे तरवारीस, भोसकणाऱ्या तरवारीस, तिप्पट जोर येईल; त्यांस घेरणारी तरवार थोरालाही भोसकणारी होईल. (यहेज्केल २१:१४)
वाक्य लक्षात घ्या, तिसऱ्या वेळी तरवारीने दुप्पट विनाश करू दे: नबुखद्दनेस्सर ने अगोदरच यरुशलेमवरदोनदा आक्रमण केले आणि त्यास ताब्यात घेतले होते. पुढच्या वेळी-तिसऱ्या वेळी-तो आणखी अधिक विनाश करेल.
तरवार दुप्पट केली आहे, आणि ती तिसऱ्या वेळी येईल.
नबुखद्दनेस्सर यहूदा विरोधात तीन वेळा आला.
१. यहोयाकीम विरोधात
२. यकुन्या विरोधात
३. सिद्कीया विरोधात
तरवार ही अगोदरच दुप्पट केली होती; ही आता तिसऱ्या वेळी येणारहोती, म्हणजे, सिद्कीया विरोधात.
कारण बाबेलचा राजा चवाठ्यावर दोन रस्ते फुटतात तेथे शकुन पाहण्यासाठी थांबला आहे; तो भात्यातले बाण हलवून प्रश्न पाहात आहे, तेराफीमास कौल लावीत आहे, यज्ञपशूच्या काळजावरून शकुन पाहात आहे. (यहेज्केल २१:२१)
यहेज्केल ने रस्त्याच्या दुभागण्याजवळ नबुखद्दनेस्सरचे चित्र उभे केले, विधर्मी ज्या काही पद्धती वापरतात त्या वापरल्या की त्यांच्या देवाकडून मार्गदर्शन मिळवावे.
त्याने बाण हलविले
प्रतिमांचा सल्ला घेतला
काळजाकडे पाहिले
निनवे च्या ग्रंथालयातील पुस्तकात काळजा संबंधी डझन पेक्षा अधिक उल्लेख आहेत. काळीज हे रक्ताचे स्त्रोत असे समजले जात होते आणि म्हणून जीवनाचा आधार तोच आहे. ह्या विश्वासावरून बाबेल च्या लोकांना वाटले कीकाळजीपूर्वक निवडलेल्या मेंढराच्या काळीज चे निरीक्षण करण्याद्वारे ते देवाची इच्छा समजू शकतील.
नम्र जनांना उंच करा, आणिउच्च आहे त्यांना नम्र करा. (यहेज्केल २१:२६)
हा नेहमीचा मार्ग आहे ज्याद्वारे परमेश्वर लोकांशी व्यवहार करतो.
मी त्यांचा विध्वंस करीन,
करीनच करीन;
ही स्थिती अशीच राहावयाची नाही;
ज्याचा हक्क आहे तो आल्यावर
त्यांस मी सत्ता देईन. (यहेज्केल २१:२७)
जोपर्यंत तो येत नाही, ज्याचातो हक्क आहे, आणि मी ते त्यास देईन: सिद्कीया हा दाविदापासून आलेल्या वंशाचा शेवटचा व्यक्ति होता की यरुशलेम आणि इस्राएल वर काही अर्थाने राज्य करावे. तो आणि त्याचे राज्य उलथून टाकण्यात येईल आणि दाविदाचा कोणताही वंशज सिंहासनावर बसणार नाही जोपर्यंत तो येत नाही ज्याचा हा हक्क आहे- म्हणजे, देवाचा मशीहा, दाविदाचा खरा पुत्र येत आहे. हे अद्भुतरित्या आणि उघडपणे येशू ख्रिस्ता मध्ये पूर्ण झाले, आणि अजूनही त्याच्या अंतिम पूर्ण होण्यासाठी वाट पाहात आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८