मानवपुत्रा, तूं आपले मुख इस्राएलाच्या पर्वताकडे करून त्यांस उद्धेशून संदेश दे. (यहेज्केल ६:२)
पर्वतांना यहूदा भूमीचे भौगोलिक चिन्ह असे समजू नये परंतु एक ईश्वरविज्ञानी चिन्ह असे समजावे. पर्वते ही ठिकाणे होती जेथे इस्राएल लोकांनी मूर्तीपूजा केली.
असे म्हण: इस्राएलाच्या पर्वतांनो, प्रभु परमेश्वराचे वचन ऐका; प्रभु परमेश्वर पर्वत, टेकडया, नाले व खोरी यांस म्हणतो, पाहा, मी, मीच तुम्हांवर तरवार आणून तुमची उच्च स्थाने उध्वस्त करीन.(यहेज्केल ६:३)
जेव्हा पर्वतांना सरळपणे उद्देशिले आहे, तर संदेश हा टेकडया, नाले व खोरी यांना उद्धेशून सुद्धा आहे. हा संपूर्ण क्षेत्र विधर्मी उच्च स्थानाच्या उपस्थिती द्वारे दूषित झाला होता.
अशा उच्च स्थानांचा अवशेष हा तनाख, गेजेर, पेट्रा येथे शोधून काढला होता. कनानी लोकांच्या उच्च स्थानांची मुख्य गुणधर्म ही(१) वेदी(२) उभा दगड (३) अशेरा चे चिन्ह म्हणून एक लाकडी खांब आणि (४) मोठे पात्र.
हिज्कीया आठव्या शतकात, आणि योशीया सातव्या शतकात, यांनी निश्चित प्रयत्न केले की राष्ट्रामधून हे ईश्वरविज्ञानी कॅन्सर काढून टाकावे. दुर्दैवाने, नंतरच्या राजांनी ते होऊ दिले आणि/किंवा तशा आचरणास प्रोत्साहन दिले (२ राजे १८:४; २३:५).
यिर्मया आणि यहेज्केल या दोघांनी योशीया च्या सुधारणा प्रयत्नानंतर अशा भ्रष्ट आचरणाच्या झालेल्या वाढीची साक्ष दिली.
प्रभु परमेश्वर म्हणतो, आपले हातपाय आपटून म्हण: इस्राएल घराण्याच्या सर्व अमंगळ दुष्कार्मांचा धिक्कार असो. (यहेज्केल ६:११)
ह्या नाटकीय कृती सह, यहेज्केल ला त्यावर जोर द्यायचा होता जे त्याने आत्ताच म्हटले होते. त्याने आपले हात आणि पाय आपटायचे होते. हे हावभाव हे तीव्र भावना किंवा उत्सुकतेस व्यक्त करणे होते जे एकतर आनंद किंवा शोक द्वारे निर्माण झाले आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८