तुझ्या सौंदर्यामुळे तुझी कीर्ती राष्ट्रांत पसरली; कारण मी तुला दिलेल्या तेजाने तुझे सौंदर्य अप्रतिम झाले, असे प्रभु परमेश्वर म्हणतो. तूं तर आपल्या सौंदर्यावर भरंवसा ठेवून आपल्या कीर्तीच्या जोरावर शिंदळकी केली, आल्यागेल्याबरोबर शिंदळकीचा तूं सपाटा चालविला; तुझे सौंदर्य त्यांस लुटावयास सापडेल. (यहेज्केल १६: १४-१५)
इस्राएल त्यांची प्रसिद्धी सांभाळू शकले नाही. यशही अंतिम परीक्षा आहे. संपन्नता(गरिबी नाही)ही व्यक्ति, राष्ट्राची अंतिम परीक्षा आहे. अनेक लोक अपयश सांभाळू शकतात परंतु थोडेच यश सांभाळू शकतात.
पाहा, तुझी बहिण सदोम हिचे पाप येणेप्रमाणे होते: गर्व, अन्नाची विपुलता व ऐषआराम ही तिला व तिच्या कन्यांना होती; दरिद्री व गरजवंत यांस तिने हात दिला नाही. त्यांनी उन्मत्त होऊन माझ्यासमोर अमंगळ कृत्ये केली ती पाहून मी त्यांचा निःपात केला. (यहेज्केल १६:४९-५०)
सदोमाचे पाप(यहेज्केल १६:४९)
१. गर्व
२. अन्नाची विपुलता-खादाडपणा
३. अत्यंत आळशीपणा
४. दरिद्री व गरजवंतांची काळजी केली नाही
तूं आपल्या वडील बहिणी व आपल्या धाकटया बहिणी यांचा अंगीकार करिशील तेव्हा तूं आपले आचरण स्मरून लज्जित होशील, आणि त्या तुझ्याबरोबर केलेल्या करारातल्या नसल्या तरी त्या कन्या म्हणून देईन. मी तुजबरोबर आपला करार स्थापीत करीन तेव्हा तुला समजेल की, मी परमेश्वर आहे.(यहेज्केल १६:६१-६२)
परमेश्वराने इस्राएल ला ती एक वेश्या आहे असे वर्णन केले आहे जिने विवाहाचा करार मोडला आहे आणि दुसऱ्या मनुष्यांच्या मागे गेली आहे.मुर्त्या आणि त्यांच्या भोवतालच्या राष्ट्रांच्या मार्गांचे अवलंबन करण्याचे त्यांनी निवडिले आहे.
कारण त्यांनी असे राहावे म्हणूननिवडिले, परमेश्वराने त्यांना नष्ट करणे व गंभीरपणे शिक्षा करण्याचे निवडिले.
तथापि, शिक्षा दिल्यानंतर काही वेळाने, परमेश्वर त्यांच्याबरोबर एक नवीन करार स्थापित करेन. तोच केवळ एकमेव जो त्यांच्या सर्व पापांबद्दल प्रायश्चित्त करणारा असेन जरी ते त्यासाठी पात्र असे नाहीत.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८