तो मला म्हणाला, मानवपुत्रा, अधर्माची योजनाकरणारे व या नगरात अनिष्ट संकल्प करणारे पुरुष ते हेच. (यहेज्केल ११:२)
येथे नेहमीच लोक असणार आहेत जे नगरात, राज्यात व राष्ट्रात वाईट सल्ले देणार आहेत.
प्रार्थना
१. प्रत्येक गट जो ह्या शहरात वाईट सल्ले देतो तो येशूच्या नांवात नष्ट होवो.
२.परमेश्वरा ह्या शहरात, राष्ट्रात चांगले सल्ले देणारे नेते उभारून आण येशूच्या नांवात.
मला ठाऊक आहे तूं काय बोलत आहे, कारण तुझ्या मनात जो प्रत्येक विचार येतो तो मी जाणून आहे.(यहेज्केल ११:५)
आपल्या मनात येणारे प्रत्येक विचार परमेश्वराला ठाऊक आहे.
मग आत्म्याने मला उचलून घेऊन परमेश्वराच्या मंदिराच्या पूर्वाभिमुख पूर्ववेशीकडे आणिले; तेव्हा पाहा, वेशीपुढे पंचवीस इसम होते; त्यांच्यामध्ये याजन्या बिन अज्जूर व पलट्या बिन बनाया हे लोकनायक माझ्या दृष्टीस पडले.(यहेज्केल ११:१)
मंदिराच्या पूर्वे द्वारा जवळ, यहेज्केल ने पंचवीस इसम पाहिले.
८:१८ मध्ये हेच इसम सूर्याची उपासना करीत होते काय ज्यांस
यहेज्केल ने पाहिले होते? कदाचित नाही. पूर्वीचे लोक हे याजकीय गट होता, तर जे येथे दिसत होते ते साधारण साहाय्यक होते. पुढे, दोन गट हे वेगवेगळ्या ठिकाणी दिसले.
ह्याकरीताअसे म्हण, प्रभू परमेश्वर म्हणतो की, मी त्यांस राष्ट्रांत दूर घालवून देऊन देशोदेशी पांगविले आहे, तरी ज्या ज्या देशात ते गेले आहेत त्यांत मी त्यांस अल्पकाळ पवित्र स्थान होईन.
(यहेज्केल ११:१६)
आयर्न मैन (लोखंडी मनुष्य)-3 ह्या चित्रपटाचे शीर्षक, "मनुष्य न्याय बनवितो काय किंवा न्याय मनुष्याला घडविते?"
ही परमेश्वराची उपस्थिती आहे जी मंदिर बनविते, हे मंदिर नाही जे परमेश्वराच्या उपस्थितीला राखून ठेवते. भौतिक मंदिर हे पूर्णपणे आवश्यक नव्हते की परमेश्वर आणि त्याच्या लोकांमध्ये संबंध बनवावे. जरी बंदी होऊन गेलेल्या लोकांनी मंदिराला गमाविले आहे, त्यांनी परमेश्वराच्या उपस्थितीला गमाविलेले नाही.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८