प्रभु परमेश्वर म्हणतो, तुमच्यासंबंधाने शत्रू म्हणतात, अहा! ही प्राचीन उंच स्थळे आमच्या ताब्यात आली आहेत. (यहेज्केल ३६:२)
इस्राएलच्या शत्रूंचा हा दावा होता कारण त्यांनी विचार केला की आता यहूदी लोकांना पकडले आहे आणि त्यांना बंदिवासात नेले आहे, तर आता ते भूमी घेऊ शकतात.
ज्या ज्या देशात ते गेले तेथे तेथे त्यांनी माझ्या पवित्र नामासबट्टा लाविला; लोक त्यांच्याविषयी म्हणत की हे परमेश्वराचे लोक आहेत, हे त्याच्या देशातून बाहेर निघाले आहेत.(यहेज्केल ३६:२०)
हे वाक्य घ्यानात घ्या, "परमेश्वराचे लोक आणि तरीही गरीब, तरीही हताश आणि तरीही त्यांच्या भूमीतून निष्कासित. काय विरोधाभास आहे.
पवित्र शास्त्र आपल्याला हे स्पष्टपणे सांगते की हे परमेश्वराच्या नावाला बट्टा लावते.
तरीही परमेश्वर त्याच्या पवित्र नामाला बट्टा लागू देणार नाही.
प्रार्थना:
पित्या, येशूच्या नांवात,तुझ्या पवित्र नामाला माझ्याद्वारे कोणत्याही प्रकारे बट्टा लागू देऊ नको. ज्या गोष्टी मी बोलतो, आणि ज्या गोष्टी मी करतो वगैरे.
मी तुम्हांवर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल; तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ति यांपासून मी तुमची शुद्धि करीन.(यहेज्केल ३६:२५)
येशू च्या बलिदानपूर्वक मृत्यूने एक नवीन करार स्थापित केला आहे जो देवाच्या लोकांचे आध्यात्मिक शुद्धीकरण होऊ देतो. दोन गोष्टींकडे लक्ष दया ज्यांकडून देवाच्या लोकांना शुद्ध होण्याची गरज आहे
१.सर्व मलिनता
२. मूर्तीपूजा
मी तुम्हांस नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन; तुमच्या देहातून पाषाणमयहृदय काढून टाकीन व तुम्हांस मांसमय हृद्य देईन.(यहेज्केल ३६:२६)
नवीन करारात हे आध्यात्मिक परिवर्तन आश्वासित केले आहे. हे गहन कार्य असेन जे स्वतःहूनआतून बाहेरून कार्य करते.
मीतुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल, माझे निर्णय पाळून त्यांप्रमाणे आचरण कराल असे मी करीन.(यहेज्केल ३६:२७)
जुन्या करारात, पवित्र आत्मा त्यालोकांवर आला, परंतु त्यांच्यामध्ये कधी निवास केला नाही.
नवीन कराराची आणखी एक दृष्टीकोण हा पवित्र आत्म्याच्या निवास विषयी आश्वासन आहे. नवीन कराराअंतर्गत, आत्मा प्रत्येक ख्रिस्ती लोकांमध्ये निवास करतो. (रोम ८:९)
पवित्र आत्म्याचा निवास मग आपल्याला समर्थ करतो की देवाच्या आज्ञा पाळाव्या.
प्रभु परमेश्वर म्हणतो, मी तुमचा सर्व अधर्म घालवून तुम्हांस स्वच्छ करीन, तेव्हा नगरे वसतील व पडीत जागा बांधण्यात येतील असे मी करीन.(यहेज्केल ३६:३३)
तुमच्या शुद्धीकरणाचा अंश हा तो अंश आहे की तुम्ही भूमीला हस्तगत कराल.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८