मानवपुत्रा, संदेश देणाऱ्या इस्राएलाच्या संदेष्ट्यांविरुद्ध संदेश दे; जे आपल्या मनचाच संदेश देतात त्यांस सांग, परमेश्वराचे वचन ऐका; प्रभु परमेश्वर म्हणतो, जे मूर्ख संदेष्ट्ये दृष्टांत पाहिल्यावाचून आपल्याच मनातील संदेश देतात ते हायहाय करोत. (यहेज्केल १३:२-३)
जे त्यांच्या मनाचा संदेश देतात:
त्यांच्या भविष्यवाणीचे स्त्रोत हे आवश्यकपणे सैतानी असे नसते. त्यामध्ये त्यांनी जे म्हटले आहे त्यात त्यांच्या मनचे अधिक असते. त्यांच्या स्वतःच्या इच्छा, त्यांच्या स्वतःच्या आशा, त्यांचे स्वतःचे ज्ञान, आणि त्यांच्या स्वतःच्या गरजा स्वीकृत होण्यासाठी त्यांचे शब्द उच्चारले गेलेलं असतात.
मूर्ख संदेष्ट्यांना धिक्कार असो:
हे स्वार्थी संदेष्ट्ये केवळ चुकीचे नाहीत तर ते मूर्ख सुद्धा आहेत. एक कारण ते मूर्ख होते कारण ते जे देवाने म्हटले आहे त्यापेक्षा त्यांच्या स्वतःच्या हृदयातून जे आले आहे आणि त्यांच्या आत्म्यामधून जे आले आहे ते त्यांनाअधिक महत्वाचे आहे.
परमेश्वराच्या दिवशी युद्धाला तोंड देण्यास तुम्ही खिंडारातउभे राहत नाही आणि इस्राएल घराण्याचा तट तुम्ही नीट बांधून काढीत नाही. (यहेज्केल १३:५)
एक संदेष्टा हा मुख्यतः मध्यस्थी करणारा आहे. अब्राहाम हा मध्यस्थी करणारा होता. मोशे, दानीएल हे मध्यस्थी करणारे होते. हे तथाकथित संदेष्ट्ये खिंडारातउभेराहिले नाही आणि इस्राएल घराण्यासाठी मध्यस्थीचा तट सुद्धा बांधून काढिला नाही.
तुमच्या जाळ्याही [फसवणूक] मी फाडून टाकीन, तुमच्या हातातले माझे लोक मी सोडवीन; ते तुमच्या हाती यापुढे भक्ष्य होणार नाहीत; तेव्हा तुम्हांस समजेल [तुम्ही ओळखाल व जाणाल] की मी परमेश्वर आहे. (यहेज्केल १३:२१)
जेव्हा तुम्ही लोकांना सुटकेसाठी सेवाकार्य करीत आहात, याची खात्री करा की तुम्ही लोकांना सांगावे की त्यांनी त्यांच्या शरीराला बांधलेले सर्व चेटूक काढून टाकावे.
कारण ज्या धार्मिकांस मी दुखविले नाही त्याचे मन तुम्ही खोटे बोलून दुखविता, आणि दुष्टाने आपल्या कुमार्गापासून वळू नये, आपला जीव बचावू नये असे तुम्ही त्याच्या हाताला बळ देता; म्हणून यापुढे तुमचे निरर्थक दृष्टांत पाहणे व तुमचे शकून पाहणे बंद होईल; आणि मी आपले लोक तुमच्या हातातून सोडवीन; तेव्हा तुम्हांस समजेल की मी परमेश्वर आहे.(यहेज्केल १३:२२-२३)
फसवणुकीचे मूळ हे सैतानाचे खोटेपण आहे. पवित्र शास्त्र सैतानाच्या ह्या दिनचर्येस [कार्य करण्याच्या पद्धतीला] स्पष्टपणे प्रगट करते. "तुमच्या खोटेपणामुळे तुम्ही धार्मिकांस दुखविले आहे, त्यास दुखविता, ज्यास मी कधी दुखी किंवा निराश केले नाही" खोटेपण मग भीती निर्माण करते.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८