नंतर अकराव्या वर्षी महिन्याच्या प्रतिपदेस, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले ते हे: मानवपुत्रा, सोर यरुशलेमेविषयी म्हणत आहे, अहा! जी केवळ राष्ट्रांचे प्रवेशद्वार अशी होती ती मोडून गेली आहे आणि आता लोकप्रवाह मजकडे वळला आहे; ती उजाड झाली आहे, म्हणून आता माझी भरभराट होणार आहे; यास्तव प्रभु परमेश्वर म्हणतो, पाहा, अगे सोरे, मी तुजविरुद्ध आहे, समुद्र आपल्या लाटा लोटीतो त्याप्रमाणे मी तुजवर बहुत राष्ट्रे लोटीन. (यहेज्केल २६:१-३)
देवाच्या लोकांविरुद्ध तुम्ही जे बोलता ते तुम्हाला गंभीर संकटात टाकू शकते. सोर च्या संकटाचे कारण हे अंशतः याकारणासाठीकी त्याने यरुशलेम विषयी काय म्हटले होते.
लोक देवाच्या लोकांच्या विरोधात बोलले याची पवित्र शास्त्रातून उदाहरणे
१. मिर्याम व अहरोनचे मोशे विरुद्ध बोलणे
मोशेने कुशी लोकांतली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्याविरुद्ध बोलू लागले. ते म्हणाले, त्याने कुशी लोकांतली स्त्री बायको करून घेतली आहे. ते म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला? परमेश्वराने ते ऐकले. (गणना १२:१-२)
२. कोरह मोशे विरुद्ध
कोरह बिन इसहार बिन कहाथ बिन लेवी आणि रऊबेन वंशातील अलीयाबाचे मुलगे दाथान व अबीराम आणि ओन बिन पेलेथ. हे इस्राएलातील अडीचशे लोकांना बरोबर घेऊन मोशेविरुद्ध उठले; हे लोक सरदार असून मंडळीचे प्रतिनिधी व नामांकित पुरुष होते. (गणना १६:१-२)
३. इस्राएल चे लोक मोशे विरुद्ध बोलत होते
ते परमेश्वराविरुद्धव मोशेविरुद्ध असे बोलू लागले की, तुम्ही आम्हांला मिसर देशातून काढून ह्या रानात मरावयाला कशाला आणिले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो. (गणना २१:५)
४. मुलेबाळे अलीशा विरुद्ध बोलत होती
तो तेथून वरती बेथेलकडे चालला; तो वाट चढून जात असता नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, अरे टकल्या, चालता हो. (२ राजे २:२३)
आज अनेक लोकांच्या जीवनात अनेक गोष्टी ह्या चुकीच्या होत आहेत कारण ते देवाच्या सेवकांच्याविरुद्ध बोलले होते आणि देवाचा क्रोध हा त्यांच्याविरुद्ध पेटला होता.
प्रभु परमेश्वर म्हणतो, मी तुला निर्जनझालेल्या नगरांप्रमाणे ओसाड नगरी करीन व तुजवर खोल सागराचा लोट आणून प्रचंड जलप्रवाहांनी तुला व्यापून टाकीन. (यहेज्केल २६:१९)
स्पष्ट होते की सोर हे पाण्याखाली बुडले होते. काही हा अनुमान लावतातकी सोर ही हरवलेली आटलांटीस नगरी असेन. यास काहीही विश्वसनीय पुरावा नाही.
लोकांस दहशत पडेल असा तुझा मी विध्वंस करीन, तूं नाहीशी होशील; तुझा शोध करितील तरी तूं कधीही सापडावयाची नाहीस, असे प्रभु परमेश्वर म्हणतो.(यहेज्केल २६:२१)
परमेश्वराने स्पष्टपणे म्हटले होते कीसोर हीकधीही सापडणार नाही.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८