बंडखोरपणा हा जेव्हा तुम्हाला पाहण्यास डोळे आहे तरी पाहण्यास नकार देणे आणि ऐकण्यास कान आहेत तरी ऐकण्यास नकार देणे आहे. (यहेज्केल १२:२)
त्यांच्यादेखत तटास आरपार भोक पाड व त्यांतून आपले सामानसुमान ने. (यहेज्केल १२:५)
लोकांच्या सरळ दृष्टीकोनात त्यास त्यांच्यादेखत तटास आरपार भोक पाडायचे होते. हा संदर्भ शक्यतो त्याच्या घराच्याअंगणाच्याभिंतीचा होता, शहराच्या भिंती बद्दल किंवा घरा बद्दल नाही. बाबेल मधील भिंती ह्या उन्हाने सुकविलेल्या विटाद्वारे बनविलेल्या होत्या जे हाता द्वारे काही शक्ती लावून काढले जाऊ शकत होते. भिंतीमधील भोक द्वारे, यहेज्केल ला त्याच्या बंदिवासाचे सामानसुमान घेऊन जावयाचे होते.
संदेष्टा यहेज्केल जरी बाबेल मध्ये बंदिवान होता, तरी त्याने त्याच्या भावांसंबंधी संदेश दिला, जे अजूनही कनान च्या भूमी मध्ये होते. त्याची एक भविष्यवाणी ही सिद्कीया विषयी होती जो "यरुशलेम मध्ये राजकुमार" अशी सेवा करीत होता. (यहेज्केल १२:१०)
त्यांस सांग: प्रभु परमेश्वर म्हणतो की हे देववचन यरुशलेमेतील अधिपतीस व ज्या इस्राएल घराण्यांतले ते आहेत त्या सर्व घराण्यांस लागू आहे; मी त्यांस करून दाखविले तसेच त्यांस घडेल; ते हद्दपार होतील, बंदिवासात जातील. त्यांच्यातला सरदार अंधार पडला असता खांद्यावर सामान घेऊन निघून जाईल, ते तट फोडून त्यांतू ते नेतील; तो आपले मुख झाकील म्हणजे त्याच्या डोळ्यांना भूमि दिसावयाची नाही. (यहेज्केल १२:१०-१२)
संदेष्ट्याने घोषित केले की"इस्राएल चे बंडखोर घराणे" घमंडी राज्यकर्त्यांसह बंदिवासात नेण्यात येईल (वचन ११, १२).
सिद्कीया विषयी विशेषकरून, संदेष्टा यहेज्केल, परमेश्वरा साठी बोलतो, घोषित करतो: "मी त्याजवर आपले जाळे टाकीन म्हणजे तो माझ्या पाशात सापडेल; मी त्यांस बाबेलास खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन; पण तो देश त्याला दिसणार नाही व तो तेथेच मरेल.(यहेज्केल १२:१३)
जेव्हा बाबेल चे सैन्य ५८६ मध्ये यरुशलेम विरोधात आले, सिद्कीया नगरातून पळाला, आक्रमण करणाऱ्यांकडून सुटून पळून जाण्याची अपेक्षा केली. त्याचा पाठलाग केला गेला, तथापि, त्यास यरीहो जवळ पकडण्यात आले. मग त्यास रिब्ला, येथेकनान च्या उत्तरेकडे आणण्यात आले.
तेथे त्यास त्याच्या पुत्रांचा वध होताना पाहावयास लावले. ह्या पृथ्वीवर ते शेवटचे दृश्य होते जे त्याने पाहिले. नंतर त्याचे डोळे फोडण्यात आले आणि त्यास साखळदंडाने बांधून बाबेल ला नेण्यात आले. त्यांसतुरुंगात टाकले, आणि शेवटी तो त्या दूरच्या देशात मरण पावला (२ राजे २५: ६, ७; यिर्मया ३९:७, ५२:११). यहेज्केल ची भविष्यवाणी शब्दशः पूर्ण झाली.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८