मग त्याने मला मंदिराच्याद्वाराकडे परत नेले, तो पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता; मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती; तो झरा मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती; तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तर द्वाराच्या वाटेने बाहेर नेले, व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमुख असलेल्या द्वाराकडे नेले, तो पाहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. (यहेज्केल ४७:१-२)
युद्ध पवित्र आत्म्याला प्रतिनिधित करते. योहान १४:१६-१८ पाहा. ते हे तीन प्रकारे करते:
उगम-ते देवाच्या सिंहासनाकडून येते. पवित्र आत्मा हा सुद्धा अगदी देवाच्या सिंहासनाकडूनच आला.
ठिकाण-ते वेदिकडून येते जे ठिकाण आहे जेथे अंतिम बली अर्पण केला गेला आणि पवित्र आत्मा हा ख्रिस्ताच्या वेदी वधस्तंभा कडून आला. (मत्तय २०:२८, योहान १६:७)
मग तो पुरुष पूर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते. त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले, तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यांतून चालावयास सांगितले, तो तेथे पाणी गुडघ्यापर्यंत होते.त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यांतून चालावयास सांगितले, तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापिले तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आले असते; उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. तो मला म्हणाला, मानवपुत्रा, तूं हे पाहिले ना? मग त्याने मला नदीतीराने माघारी नेले. (यहेज्केल ४७:३-६)
आता, एक गोष्ट आहे कीनदी पाहावी आणि दुसरी ही की त्याने पूर्णपणे भिजून जावे! येथे अनेक आहेत जे शुभवर्तमान ऐकतात, त्यांच्याभोवतालच्या लोकांच्या जीवनात परमेश्वर काय करीत आहेत ते पाहतात परंतु ते त्यात कधी शिरत नाहीत.
कारण त्या नदी ने तुमच्यासाठी काही चांगले करावयास पाहिजे, तर तुम्हाला त्यात उतरावे लागेल. तुम्हाला त्याने भिजावे लागेल, प्रेषित ८:३६-३७ मधील इथिओपियाच्या षंढा प्रमाणे.
घोट्यापर्यंत खोल
गुडघ्यापर्यंत पाणी म्हणजे अक्षरशः माझ्या पायाच्या तळव्याला पाणी. हे पित्याच्या आज्ञेत आपलेचालणे याबाबत बोलते.
यशया १;१९ मध्ये पिता आपल्याला सांगतो की, जर आपण तयार आणि आज्ञाधारक आहोत तर आपण त्या भूमीचा चांगला उपज खाऊ परंतु आपण शत्रू द्वारे भस्म होऊ जर आपण अवज्ञेद्वारे चालू!
परमेश्वर त्याच्या लोकांना म्हटला, हे बोलत, "जेथे तुमचे पाऊल पडेल ते प्रत्येक स्थल तुमचे होईल..." (अनुवाद ११:२४). एक आशीर्वादाचे जीवन हा काही अपघात नाही. हे जीवन आहे जे उद्देशासह जगलेले आहे. आपण आपण आपल्या जीवनासाठी उद्देशपूर्ण देवाच्या मागे चालले पाहिजे.
गुडघ्यापर्यंत खोल
पाणी गुडघ्यापर्यंत अभिषिक्त प्रार्थनामय जीवनाच्या सामर्थ्या बद्दल बोलते. येशू आपल्याला सांगतो की जर आपण त्यास गुपित ठिकाणी भेटतो, तर तो त्याचा आत्मा व सामर्थ्याने उघडपणे आपल्याला पुरस्कार देईल (मत्तय६:६)
आपण जितके प्रार्थनामय आहोत तेवढेच आपण सामर्थ्यशाली असे आहोत! केवळ तेव्हाच जेव्हा आपण तळमळीने प्रार्थना करतो तेव्हाच आपण परमेश्वराचा संपूर्ण उद्देश आपल्यासाठी काय आहे हे पाहू शकतो-वैयक्तिक आणि सांघिकपणे!
कमरेपर्यंत खोल
पाणी कमरेपर्यंत आध्यामिक सामर्थ्याविषयी बोलते. पौल आपल्याला आपली कंबर सत्याने कसण्याविषयी बोलत आहे (इफिस ६:१४). हे देवाचे वचन आहे जे आध्यामिक सामर्थ्य पुरविते!....तरुणांनो मी तुम्हाला लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहां. तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकिले आहे. (१ योहान २:१४).
यशया ३३:६ प्रगट करते: सुज्ञता व ज्ञान हे तुमच्या वेळेची स्थिरता होईल, आणि तुमच्या तारणाचे सामर्थ्य.....सुज्ञता व ज्ञान हे देवाचे वचन आहे. आपण परमेश्वरामध्ये बलवान होऊ शकतो जर आपण देवाच्या वचनात बलवान असलो! हे पवित्र आत्म्याला पाया पुरविते की आपला उपयोग करावा.
पाणी ज्यात पोहता येते
शेवटी, यहेज्केल त्या पाण्याचा उल्लेख करतो ज्यात कोणी पोहलेच पाहिजे. हे ते ठिकाण आहे जेथे नदी तुम्हांवर येते. नदी ह्या ठिकाणी इतकी खोल आहे की तुम्ही आता पूर्णपणे नदीच्या दयेमध्ये आहात. तेथे असा मार्ग नाही की त्यास वरून पार करता येईल कारण ती खूप खोल आहे आणि तेथे काही पूल नाही.
ख्रिस्ती लोकांच्या जीवनात हे आपल्या स्वयं प्रयत्नांची शेवट ह्याबद्दल बोलते. परमेश्वराला पाहिजे की आपण प्रत्येक जण पूर्ण समर्पणाच्या स्थानी यावे.
स्मिथ विगल्सवर्थ, देवाचा महान व्यक्ति, कदाचित त्याने फारच चांगले असे सारांशीत केले आहे जेव्हा त्याने म्हटले: "माझे सर्वकाही- देवाचे काही नाही; माझे फार कमी-देवाचे अधिक, माझे काहीही नाही-सर्वकाही देवाचे! पाण्याची इच्छा ही तुमची इच्छा होते.
प्रार्थना:
पित्या, येशूच्या नांवात, माझे आज्ञापालन व शरण जाण्याद्वारे तुला पूर्णपणे समर्पित करण्यास मला शिकीव. तुझ्या उपस्थितीच्या सखोल पाण्यात पाऊल ठेवण्यास मला प्रेरणा दे.
तो मला म्हणाला, हे पाणी पूर्वदेशाकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तेथेतेथे तीत जे जीवजंतु भरलेले असतील ते जगतील व तीत मासे विपुल होतील, कारण जेथेजेथे हे पाणी जाईल तेथेतेथे सर्व काही निरोगी होईल; जेथेजेथे ही नदी जाईल तेथेतेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. (यहेज्केल ४७:८-९)
लक्षात घ्या, जेथेजेथे ही नदी जाते, तेथेतेथे जी जीवन आणते. पवित्र आत्मा हा जीवनाचा आत्मा आहे. तो स्वतंत्रतेचा आत्मा आहे. (२ करिंथ ३:१७)
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ४७
- अध्याय ४८