माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन
तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक. (स्तोत्रसंहिता 4:1)
दाविदाला हे फार चांगल्या प्रकारे माहित होते की त्याचे नीतिमत्व हे देवापासून येते, आणि ते स्वतःपासून नाही. तो त्यास हाक मारतो तो एकमेव जो त्याला नीतिमान करतो.
तुमच्या क्रोधाला कसे सांभाळावे?
तर तुम्ही रागवा, पण पाप करू नका (स्तोत्रसंहिता 4:4)
वचनाचा हा उतारा ना ही केवळ आपल्याला उपदेश देतो की, “राग करा, पण पाप करू नका.” ते हे सुद्धा म्हणते, “ रागास मंद असावे कारण मनुष्याच्या रागाने देवाच्या न्यायत्वाचे कार्य घडत नाही.” (याकोब १:२०)
या उताऱ्याची गहन समज असावी म्हणून, आपण येशूच्या जीवनाची पडताळणी करावी, ज्याने त्याचे उदाहरण म्हणून सेवा केली. आपण जेव्हा मार्क 3 हा अध्याय वाचतो, आपण त्या प्रसंगाकडे येतो ज्यामध्ये येशूने एका मनुष्याला बरे केले ज्याचा हात वाळलेला होता. “मग त्याने त्यांस म्हटले, शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचविणे किंवा मारणे, यातून कोणते उचित आहे? पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या मनुष्याला सांगितले, आपला हात लांब कर; त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला” (वचन ५). आणि मग त्याने त्या मनुष्याला बरे केले. राग जो येथे व्यक्त केला आहे त्याने येशूला पाप करावयास लावले नाही, परंतु त्याने अवश्य त्यास खिन्न केले.
तुम्ही झोपायच्यावेळी त्या गोष्टीचा विचार करा आणि शांत पडून राहा. (स्तोत्रसंहिता 4:4)
स्तोत्रकर्ता आपल्याला सांगत आहे की आपण रागाचे विचार काढून टाकावे आणि देवाच्या वचनावर मनन करावे. आपण जेव्हा रागाला आपल्या अंत:करणात राहू देतो, आपण त्यावर विचार करीत राहतो, व लोकांशी वादविवाद करण्याद्वारे आपल्या स्वतःला देवाच्या इच्छेच्या विरुध्द करतो.
तसेच, जेव्हा आपण रागाला खतपाणी घालतो, आपण कदाचित निष्कर्ष व निर्णयापर्यंत पोहचू जे आपण सहसा नाही केले पाहिजे. अशा अवस्थेत शांत राहणे सुद्धा शक्य नाही कारण विचार सतत आपल्या अंत:करणात डोकावत राहतात, आपल्याला आणखी अस्थिर करीत असतात. क्षुब्ध होण्याऐवजी त्यावर मनन करा.
धान्याची व द्राक्षारसाची समृद्धि झाली म्हणजे लोकांस जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तूं माझ्या मनात उत्पन्न केला आहे. (स्तोत्रसंहिता ४: ७)
प्रार्थना:
पित्या, येशूच्यानांवात मी तुझे आभार मानतो की तूंधान्याची व द्राक्षारसाची समृद्धिज्यांच्याकडे अधिक झाली आहे त्यांच्यापेक्षा मला अधिक आनंद दिला आहे.
काही लोकांना त्यांच्या उपज मध्ये आनंद होतो आणि त्यात काही चूक नाही परंतु परमेश्वर तुम्हांला त्यापेक्षा अधिक आनंद व हर्ष देऊ शकतो.
तेव्हा काय करावे जेव्हा तुम्ही झोपू शकत नाही?
मी स्वस्थपणे पडून लागलाच झोपी जातो, कारण हे, परमेश्वरा, तूच मला एकांतात निर्भय ठेवितोस. (स्तोत्रसंहिता ४: ८)
मला पुढील ईमेल आले:
पास्टर, जेव्हा मी उशीवर डोके ठेवतो, मी एकदा वरील छताकडे पाहतो आणि मग विचारात गढून जातो-काय जर? हे कसे काय? ते असे का? मी हे कसे करू शकतो? तो असे कसे करू शकतो? तर मग काय?
रात्रीची शांतता केवळ ह्या विचारांना वाढण्यास अधिक जागा देतात. मी काय केले पाहिजे?
मग येथे अनेक शारीरक गोष्टी आहेत ज्या मला शीण आणतो, शांततेचा अभाव सुद्धा मला शीण आणतो. याचा अर्थ पुढील दिवस हा मोठया आवाहनांचा असू शकेल.
मला जे काही सांगावयाचे आहे, ते हे की, तुम्हाला विश्वास ठेवण्याची गरज आहे की परमेश्वर तुम्हाला शांति आणि आवश्यक विश्रांतीची झोप देतो. ह्या वचनावर दररोज दावा करा.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०