परमेश्वर माझा मेढंपाळ आहे;
मला काही उणे पडणार नाही. (स्तोत्र २३:१)
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हे वचन एका नातेसबंधाबद्दल बोलते
जर परमेश्वर तुम्हाला घेऊन चालत असेल तर तुम्हाला कधीही कमी पडणार नाही. तुमच्या आयुष्यात काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो;
तो मला संथ पाण्यावर नेतो. (स्तोत्र २३:२)
बर्याच वर्षांपूर्वी मला स्वर्गाचे दर्शन झाले होते. मी लोकांना समुद्रातून किंवा विशाल सरोवरातून बाहेर पडताना पाहिले. या तलावावर किंवा समुद्रावर कोणत्याही लाटा नव्हत्या. ते पुर्णपणे शांत होते. आणि मग लोक खूप सुंदर आणि शुभ्र अशा सुंदर शहरात प्रवेश करतात. मी एक आवाज ऐकला जो मला सांगत होता त्यांच्या आठवणीना उजाळा मिळाला आहे. एक भाषांतर ‘शांत पाणि’ असे प्रतिपादन करते.
तो माझा जीव ताजातवाना करतो;
तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गानी चालवतो. (स्तोत्र २३:३)
आपला जीव कसा पुर्नस्थापीत केल्या जाऊ शकतो? आपल्या जीवनात देवाच्या कार्यावर लक्ष केंद्रित आहे. आपण स्वतःला पुर्नस्थापीत करू शकत नाही परंतु देवच पुर्नस्थापीत करू शकतो.
मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. ( स्तोत्र २३:४)
डॉ. रेमंड मूडी यांनी बर्याच लोकांची मुलाखत घेतली जे काही तासासाठी, वैद्यकीयदृष्ट्या मृत होते, आणि त्यांनी जे पाहिले त्याचे वर्णन करण्यासाठी ते रहस्यमयरीतीने परत आले.
त्यांच्यातील काहींजनांनी येथे वर्णन केले आहे. “मोठ्या वेगाने अंधाऱ्याच्या बोगद्यात ओढल्यासारखी किंवा अंधाऱ्याच्या बोगद्यात अत्यंत गतीने ओरबडल्यासाऱखी अनुभुती आहे. बोगद्याचे वर्णन "दार", "काळोखाची दरी", "विहीर", "गटार" किंवा "खड्डा" असेही केले आहे. बोगद्यातील एका व्यक्तीने म्हटले आहे की, "मी गोंधळाला, या गोंगाटाला, पार करत सरकत होतो".
दुसरा व्यक्ती म्हणाला, "मी या काळोखाच्या दरीतून खोऱ्यातून जलद गतीने गेलो". बोगद्यात काहीवेळा दूर शेवटच्या टोकाला प्रकाश असतो ज्यामुळे ती व्यक्ती त्या दिशेने जाते. ”
तुझी काठी आणि तुझी आकडी , मला धीर देते. हे वचन शिस्त व सुधारणेविषयी बोलते.
तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस;
तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस;
माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे.. (स्तोत्र २३:५)
तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यासाठी मेज तयार करतोस. हे वचन असामान्य कृपेबद्दल बोलते. तू माझ्या डोक्यावर तेलाने अभिषेक करतोस. हे वचन पावित्र्याचे बोलते. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. हे वचनाने विपुलतेसबंधी भाष्य केले आहे.
खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील; आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. (स्तोत्र २३:६)
एकोणिसाव्या शतकातील प्रख्यात लेखक डी.एल.मुडी यांच्याकडे एकदा सल्लामसलत करण्यासाठी एक महीला आली. तिने दावा केला की, दोन पुरुष तिच्यामागे येत होते.
मूडी यांना समजले की ही मौल्यवान स्त्री मानसिक भ्रमाने ग्रस्त होती (नंतर तिच्या मित्रांनी याची पुष्टी केली). तिचा पाठलाग कोणी करत नव्हते. पण तिला आराम देण्यासाठी त्याने तिला सांगितले: “तुझ्यामागे येणारी दोन माणसे दावीदाची माणसे आहेत. त्यांची नावे म्हणजे चांगुलपणा आणि दया. " त्याने पवित्र शास्त्रात स्तोत्र २३:६ हे वचन काढले आणि तिला दाखवले की, “खरोखर तुझ्या आयुष्याच्या सर्व दिवसात तुला दया आणि कल्यान लाभेल.” ती सुटका पावली आणि म्हणाली: “हे आश्चर्यकारक आहे. त्यांची नावे काय आहेत याचा मला नेहमीच प्रश्न पडला होता. ” ती स्त्री मनाची शांती घेऊन त्या दिवशी निघून गेली, हे जाणून घेवून सांत्वन पावली की आपल्यामागे येणारे म्हणजे चांगुलपणा आणि दया आहे.
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०