या स्तोत्रामध्ये, दावीद प्रथम बंडखोर पापी व्यक्तीचे वर्णन करतो (वचने १-४), नंतर नीतिमान मनुष्याच्या धन्यतेचे वर्णन करतो (वचने ५-९), आणि नीतिमान मनुष्याचे वाईटापासून रक्षण केले जाईल या प्रार्थनेने त्याची समाप्ती करतो (वचने १०-११).
त्याच्या डोळ्यासमोर देवाचे भय नाही (स्तोत्रसंहिता ३६:१)
प्रेषित पौलाने रोमकरांस पत्र ३:१८ मध्ये हे वचन उद्धृत केले आहे
जेव्हा अब्राहम गरारच्या प्रदेशात गेला, त्याला समजले की त्या देशातील लोक देवाचे भय बाळगत नाहीत आणि म्हणूनच तो म्हणाला, “या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील, असे मला वाटले” (उत्पत्ती २०:११). देवाची भय म्हणजे काय? पवित्र सर्वशक्तिमान देवाचा हा एक मनापासून केलेला आदर होय. हे पाप टाळण्याचे एक निरोगी आणि धार्मिक साधन आहे. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की देवाबद्दलचे आदरयुक्त भय देशातील वाईट गोष्टींना नष्ट करून टाकते.
त्याचे शब्द खोटे असतात त्यांना कवडीची किंमत असते
तो शहाणा होत नाही किंवा सत्कृत्य करायला शिकत नाही. (स्तोत्रसंहिता ३६:३)
जे अंतःकरणात आहे तेच तोंडावाटे बाहेर पडते. (मत्तय १२:३४)
सर्व रात्रभर तो चुकीच्या किंवा वाईट गोष्टींच्या योजना आखतो.
तो उठल्यावर काहीही चांगले करीत नाही.
परंतु तो काही वाईट करायला नकारही देत नाही. (स्तोत्रसंहिता ३६:४)
जरी तो अंथरुणावर झोपलेला असला तरी, त्याचे वाईट मन आणि हृदय येणाऱ्या दिवसाच्या आपल्या योजना आखत असतात. हा माणूस वाईट गोष्टींचा द्वेष करीत नाही, खरं तर, जर त्याला वाटते की असे केल्याने त्याला फायदा होईल, म्हणून असे करणे त्याच्यासाठी वाईट नाही.
तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे.
माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात. (Psalm 36:7)
“तुझ्या पंखांची सावली”: काहीजण या गोष्टीला कोशावरील करुबाच्या पंखांचा संदर्भ म्हणून पाहत असले तरी, हा कदाचित पक्षीणीच्या आपल्या लहान पिल्लांसाठी असलेल्या रक्षणार्थ काळजीचा संदर्भ अधिक असावा.
आपल्या पिल्लांना आपल्या पंखांच्या छायेत आश्रय देणारी पक्षीण म्हणून देवाची अशी सांत्वनदायक प्रतिमा स्तोत्रांमध्ये आढळते (१७:८; ५७:१; ६१:४; ९१:४).
देवाच्या घरामध्ये (मंडळी)त्याची परिपूर्णता असणे गरजेचे आहे. तरच लोक समाधानी होतील (स्तोत्रसंहिता ३६:८)
परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो.
तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस. (स्तोत्रसंहिता ३६:८)
आपल्याला ज्या नदीचे पाणी प्यावयाचे आहे, ती नदी देवाच्या सिंहासनावरुन वाहणारी नदी आहे. प्रभु येशू विहिरीजवळ त्या शोमरोनी स्त्रिला म्हणाला की जर तिने हे पाणी पिले तर, तिला पुन्हा कधीच तहान लागणार नाही. आपल्याला ज्या झाडापासून खावयाचे आणि ज्या नदीचे पाणी प्यावयाचे आहे, त्या दोन्ही गोष्टी स्वर्गात आहेत, जसे आपण पुढील वचनांमध्ये वाचले.
नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्पष्ट होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती. २ आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर उगवलेली झाडे जीवनाची झाडे होती. त्यांच्यातील प्रत्येक झाड दरमहा आपले फळ देते. झाडांची पाने राष्ट्रांना आरोग्य देण्यासाठी उपयोगी पडत होती. (प्रकटीकरण २२:१-२)
Join our WhatsApp Channel

Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०
- अध्याय ४१
- अध्याय ४२
- अध्याय ४३
- अध्याय ४४
- अध्याय ४५
- अध्याय ४६
- अध्याय ४७
- अध्याय ४८
- अध्याय ४९
- अध्याय ५०
- अध्याय ५१
- अध्याय ५३
- अध्याय ५४
- अध्याय ५५
- अध्याय ५६
- अध्याय ५७
- अध्याय ५८
- अध्याय ५९
- अध्याय ६०
- अध्याय ६१
- अध्याय ६९
- अध्याय ७०
- अध्याय ७१
- अध्याय ७२
- अध्याय ७६
- अध्याय ७७
- अध्याय ७९
- अध्याय ८०
- अध्याय ८१
- अध्याय ८२
- अध्याय ८३
- अध्याय ८५
- अध्याय ८६
- अध्याय ८७
- अध्याय ८८
- अध्याय ८९
- अध्याय ९०
- अध्याय १०५
- अध्याय १२७
- अध्याय १२८
- अध्याय १३०
- अध्याय १३१
- अध्याय १३२
- अध्याय १३३
- अध्याय १३८
- अध्याय १३९
- अध्याय १४०
- अध्याय १४२
- अध्याय १४४
- अध्याय १४५
- अध्याय १४८
- अध्याय १४९
- अध्याय १५०